कोल्हापूर

निर्भय वॉक

CD

फोटो-83065

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना अभिवादन
अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे निर्भय वॉक उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १२ ः शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना अभिवादन करत आज शहरातून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे निर्भय वॉक उपक्रम झाला. दाभोलकर खून खटल्याचा निकाल शुक्रवारी (ता.१०) लागला. डॉ. दाभोलकरांवर गोळ्या चालवणाऱ्या सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेपेची शिक्षा, तर खुनाचे सूत्रधार म्हणून आरोप असणाऱ्या डॉ. वीरेंद्र तावडे, विक्रम भावे यांना आणि ॲड. संजीव पुनाळेकर याला पुरावे नष्ट करण्याच्या आरोपांमधून सबळ पुरावे सादर न केल्यामुळे निर्दोष मुक्त करण्यात आले. या पार्श्वभूमीवर बिंदू चौक, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड ते पापाची तिकटी या मार्गावर निर्भय मॉर्निंग वॉक झाला.
बिंदू चौकातील महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून निर्भय मॉर्निंग वॉकची सुरुवात झाली. समितीचे जिल्हा अध्यक्ष डॉ. बी. एम. हिर्डेकर, प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील, दिलीप पवार, संभाजीराव जगदाळे, प्रा. सुभाष जाधव यांच्या हस्ते पापाची तिकटी येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून निर्भय मॉर्निंग वॉकचा समारोप झाला. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सांस्कृतिक अभिव्यक्तीच्या माध्यमातून केलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांत त्यांना मिळालेले मानधन हे डॉ. दाभोलकर यांचा विचार वाढवण्यासाठी आणि रुजवण्यासाठी संघटनेला प्रदान केले. जिल्हा कार्याध्यक्ष रेश्मा खाडे यांनी आभार मानले. यावेळी रामदास देसाई, प्रा. मांतेश हिरेमठ, राजवैभव शोभा रामचंद्र, तनिष्क जगतकर, स्वाती कृष्णात, कपिल मुळे, तनुजा शिपूरकर, कृष्णात स्वाती, अभिषेक मिठारी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: मुंबई इंडियन्स सहावे जेतेपद पटकावणार का? एक गोष्ट जी वाढवू शकते टेंशन, जाणून घ्या त्यांची बेस्ट Playing XI

Share Market Trading: शून्य ब्रोकरेज की १००% लोभ? 'मोफत' ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्सचे धक्कादायक वास्तव; गुंतवणुकीआधी नक्की वाचा

'साईबाबा मला दिसले...' संकर्षण कऱ्हाडे साईचरणी नतमस्तक, अनुभव सांगताना म्हणाला...

Ram Navami: राम नवमीला एक नाही तर चक्क दोन सार्वजनिक सुट्ट्या; योगींनी का घेतला हा निर्णय ?

पुन्हा भेटू... स्टार प्रवाहची आणखी एक मालिका घेतेय निरोप; शेवटच्या भागाचं शूट संपलं, शेअर केले फोटो

SCROLL FOR NEXT