ich211.jpg
84886
इचलकरंजी : डीकेटीईच्या टेक्स्टाईल विभागातील वर्धमान कंपनीत निवड झालेले विद्यार्थी.
डीकेटीई टेक्स्टाईलमधील १२ विद्यार्थ्यांची निवड
इचलकरंजी, ता. २१ : येथील डीकेटीईच्या टेक्स्टाईल ॲन्ड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये बी.टेक. इन टेक्स्टाईल्सच्या १२ विद्यार्थ्यांची वर्धमान टेक्स्टाईल्स लिमिटेड (लुधियाना, पंजाब) या नामांकित कंपनीमध्ये प्लेसमेंटद्वारे निवड झाली आहे.
विवेक मंगसुळे, अभिषेक कुणके, प्रज्योत पाटील, सत्यम पाटील, पार्श्व भांगडे, मोहसिनअहमद आगा, प्रतीक चौगुले, महमंदजनैद शिकलगार, ॠतिक कंदुरकर, अजय पाटील, सोहेल मुजावर, निजाम शेख या विद्यार्थ्यांची या कंपनीत निवड झाली. ते सर्वजण अंतिम वर्ष टेक्स्टाईलचे शिक्षण घेत आहेत.
याशिवाय तृतीय वर्ष टेक्स्टाईल विभागातील कमलकिशोर चौधरी, संदेश पिंगट, आदित्य बुक्का, सुजल कदम, यश जाधव, आदित्य कांबळे, सतीश कुंभार, शुभम खोत, आकाश पाटील, मयुरेश मगदूम, अंजली पांढरे या ११ विद्यार्थ्यांची विद्यावेतनावर इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे. वर्धमान टेक्स्टाईल्स लिमिटेड ही एक देशभरात विख्यात कंपनी असून, त्यांची २२ हून अधिक उत्पादने आहेत. भारतात गुजरात, मध्यप्रदेश, पंजाब अशा विविध राज्यांमध्ये त्यांच्या शाखा असून यामधून ते यार्न, ग्रे ॲण्ड प्रोसेस फेब्रिक, सुईंग थ्रेड आणि ॲक्रॅलिक फायबर, आदी उत्पादनांची निर्मिती करतात.
संस्थाध्यक्ष अध्यक्ष कल्लाप्पाणा आवाडे, उपाध्यक्ष व आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. इन्स्टिट्यूटचे प्रभारी संचालिका प्रा. डॉ. एल. एस. अडमुठे, उपसंचालक प्रा. डॉ. यु. जे. पाटील व ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्रा. एस. बी. अकिवाटे यांचे मार्गदर्शन लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.