gad212.jpg
85029
नूल : प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी क्रशरस्थळाची पाहणी केली. यावेळी ऋषिकेत शेळके व क्रशर विरोधी कृती समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ.
-----------------------------------------------
नूलच्या क्रशरस्थळाची
प्रांताधिकाऱ्यांकडून पाहणी
नूल, ता. २१ : नूलच्या हद्दीत सुरू असलेल्या क्रशरविरोधात ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. त्या अनुषंगाने प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने व तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी क्रशरस्थळाची पाहणी केली.
येथील क्रशर विरोधात वर्षभरापासून ग्रामस्थांचा लढा सुरू आहे. क्रशर हद्दपार करण्याच्या इराद्याने लोक आक्रमक झाले आहेत. क्रशर बंदच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन क्रशरविरोधी कृती समितीने लोकसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला होता. यासाठी प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्याशी झालेल्या बैठकीत त्यांनी भेट देण्याबाबत दिलेल्या आश्वासनामुळे बहिष्कार मागे घेण्यात आला. त्यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी क्रशरची पाहणी करून तातडीने अहवाल पाठवण्याची सूचनाही केली होती. प्रांताधिकारी माने यांनी दिलेल्या आश्वासनानुसार संबंधित क्रशर व उत्खननाच्या ठिकाणाची पाहणी केली. कृती समितीतील शेतकरी वसंत माने व सागर शिंदे यांनी व्यथा मांडली. ग्रामस्थांची घरे व शेती या खाणीनजीक असून, प्रत्येकाने आपल्याला होणाऱ्या त्रासाची कहाणी प्रांताधिकारी माने यांच्यासमोर मांडली. गायरानचा पाणलोट सीसीटी शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. यावेळी क्रशर शेजारील गायरान जमीन रस्त्याची पाहणी केली. तसेच वादग्रस्त ९८३ व ९९९ मधील गायरान हद्दीचा प्रश्नही माने यांनी समजावून घेतला. याबाबत योग्य ती बाजू अहवालामध्ये मांडण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मंडल अधिकारी प्रवीण कदम, तलाठी राऊत, उपसरपंच प्रवीण शिंदे, रणजित यादव, कृती समितीचे सदस्य महेश कदम, कुमार देसाई, डॉ. दिलीप मांजरेकर, सुनील नांगरे, पंकज खानापुरे, सागर शिंदे, तम्मान्ना चौगुले, भीमगोंडा देसाई यांची उपस्थिती होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.