विद्यापीठात दहशतवाद,
हिंसाचारविरोधी दिन
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात आज माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिन पाळण्यात आला. दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिन पाळण्यामागे जगात शांतता प्रस्थापित व्हावी आणि अहिंसेचा संदेश सर्वत्र पोहोचवणे, देशासाठी व दहशतवादाविरोधात लढणाऱ्या सैनिकांच्या त्याग व बलिदानाचा सन्मान करणे, तसेच भावी पिढीच्या मनात देशाच्या प्रगतीसाठी व संरक्षणाप्रती जागरुकता निर्माण करणे असा उद्देश आहे. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरील लॉनमध्ये दहशतवाद व हिंसाचारविरोधी शपथ घेण्यात आली. यावेळी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगले, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, आयक्यूएसी संचालक डॉ. सागर डेळेकर, आजीवन अध्ययन केंद्र संचालक डॉ. रामचंद्र पवार, ज्ञानस्रोत केंद्र संचालक डॉ. धनंजय सुतार, डॉ. प्रकाश बिलावर, अधिकारी, कर्मचारी व तंत्रज्ञान अधिविभागाचे विद्यार्थी उपस्थित होते. विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम समन्वयक अमोल कुलकर्णी यांनी सर्वांना शपथ दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.