कोल्हापूर

सावकारांच्या मारहाणीत रिक्षा चालकाचा मृत्यू

CD

85522
राकेश माने

सावकाराच्या मारहाणीत
रिक्षा चालकाचा मृत्यू

तीस हजारांसाठी सहा जणांनी उचलून नेले

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ : हातउसणे घेतलेल्या पैशांसाठी रिक्षाचालकाला उचलून नेऊन सहा जणांनी केलेल्या बेदम मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला. मंगळवारी (ता. २१) रात्री मारहाण करून राकेश दत्तात्रय माने (वय ४२, रा. जोशी गल्ली, विक्रमनगर) या रिक्षाचालकाला उचगावनजीक फेकून संशयित पसार झाले होते. त्याच्यावर उपचारही करण्यात आले. मात्र, त्याचा गुरुवारी (ता. २३) मृत्यू झाला. राकेशच्या मृत्यूला जबाबदार सहा जणांविरोधात राजारामपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ३० हजार रुपयांसाठी राकेशची रिक्षा काढून घेत ही मारहाण झाल्याचे त्याचा भाऊ रोशन माने याने पोलिसांना सांगितले.
फिर्यादी रोशन माने याने पोलिसांना दिलेली माहिती अशी, राकेश माने हा पत्नी, मुलगी यांच्‍यासोबत विक्रमनगरात राहण्यास आहे. काही महिन्यांपूर्वी त्याने आजारपणात खासगी सावकारांकडून हातउसणे पैसे घेतले होते. यानंतर तो पुन्हा रिक्षा चालवू लागला. त्यासाठी भाऊ रोशनने बॅंकेचे कर्ज काढून त्याला नवी रिक्षा घेऊन दिली. पण, राकेशने घेतलेल्या ३० हजार रुपयांसाठी खासगी सावकाराचा तगादा सुरू होता.
मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास त्याला सहा जणांनी घरातून बोलावून नेले होते. उचगावनजीक नेऊन त्याला बेदम मारहाण करण्यात आली. यानंतर त्याला तावडे हॉटेल चौकात जखमी अवस्थेत टाकून सहा संशयित पसार झाले. पहाटेच्या सुमारास याची माहिती रोशन याला समजली. त्याने जखमी राकेशला घेऊन बुधवारी गांधीनगर पोलिस ठाणे गाठले. त्यावेळी जखमीला उपचारासाठी गांधीनगर वसाहत रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आले. उपचारांनंतर राकेश घरी निघून गेला होता. मात्र, गुरुवारी त्याला पुन्हा त्रास जाणवू लागल्याने सीपीआरमध्ये आणले असता, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

गांधीनगर पोलिसांची दिरंगाई...
जखमी राकेशला घेऊन त्याचा भाऊ बुधवारी गांधीनगर पोलिस ठाण्यात गेला होता. बराच वेळ थांबूनही त्यांची फिर्याद नोंदविण्यात आली नव्हती. ठाणे अंमलदाराने जखमीला उपचारासाठी रुग्णालयात पाठविले; परंतु यानंतर गुन्ह्याची नोंद झाली नव्हती. गुरुवारी जखमी पुन्हा सीपीआर रुग्णालयात दाखल झाला. त्याची प्रकृती गंभीर बनल्याने प्रभारी अधिकारी दीपक जाधव स्वतः सीपीआरमध्ये दाखल झाले. ठाणे अंमलदारांनी याची गांभीर्याने दखल घेतली असती तर बुधवारीच जखमीचा जबाब नोंदविता आला असता, अशी चर्चा सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: भर पावसात फूड डिलिव्हरी बॉय पडला पाण्यात; पुण्यातला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

KKR vs SRH Live : पुन्हा २०० पार... ट्रॅव्हिस, अभिषेक, हेनरिच, नितीश यांची तुफान फटकेबाजी; कोलकातासमोर तगडे लक्ष्य

Sack Weight Limit: महाराष्ट्रात मोठा निर्णय! बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त गोण्यांवर बंदी; माथाडी कामगारांना दिलासा

Iran-Israel War: मोदींचा मास्टरस्ट्रोक! होर्मुजला शोधला पर्याय, आता तेलासाठी थेट पाईपलाईनच टाकणार; 'ब्लूप्रिंट' रेडी

११ महिन्यांच्या बाळाचा बादलीत बुडून मृत्यू, मीच जबाबदार; चिठ्ठी लिहून WFH करणाऱ्या इंजिनिअर आईनं स्वत:ला संपवलं

SCROLL FOR NEXT