कोल्हापूर

समाधी हटवली

CD

पंचगंगा स्मशानभूमीच्या
विस्तारीकरणाचे काम थांबवा

उदय गायकवाड यांची प्रशासकांकडे मागणी

कोल्हापूर, ता. ३ ः पंचगंगा नदी काठावरील समाधी स्थळ व परिसरास बाधा पोचवल्याबाबत महापालिकेचे अधिकारी व ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा. तसेच स्मशानभूमीचे विस्तारीकरणाचे काम त्वरित थांबवावे, अशी मागणी उदय गायकवाड यांनी प्रशासक व जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली.
गायकवाड यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, स्मशानभूमीनजीक छ्त्रपतींनी सन्मानपूर्वक ‘राव विश्वासराव’ व ‘सरखवास’ असा किताब दिलेल्या गायकवाड घराण्यातील ज्येष्ठांच्या समाधी आहेत. स्मशानभूमीचा विस्तार करताना त्या पाडल्या आहेत. कोणतीही परवानगी अथवा मान्यता घेतली नाही. वारसा वास्तुस बाधा पोचवणे, विटंबना करणे, भावना दुखावणे अशा कृती घडल्या आहेत. समाधी वास्तूला बाधा पोचवून आम्हा कुटुंबीय व कोल्हापूरकरांच्या भावना दुखावल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार देशातील १०८ शहरे हवा प्रदूषित असल्याने राष्ट्रीय स्वच्छ हवा मिशन अंतर्गत शहराचा समावेश आहे. पारंपरिक पद्धतीने दहन करण्याने मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण होते, याबाबत समितीच्या सभेत चर्चा झाली आहे. त्या ठिकाणी विद्युत दाहिनी बसवावी असे निर्णय झाले असताना पुन्हा जुन्या स्मशानभूमीचा विस्तार करणे गैर व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणारे आहे. त्यामुळे हे काम त्वरित थांबबावे. विटंबना झालेल्या समाधीचे बांधकाम त्वरित करून पूर्ववत करावे. ही बाब सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपला एका वर्षात देणगीपोटी मिळाले ६ हजार कोटी, सर्वाधिक कॉर्पोरेट सेक्टरमधून; एकट्या भाजपला काँग्रेससह ४ पक्षांच्या दहापट देणगी

Sangola Crime : हरवलेल्या १०० महिलांचा लावला शोध; सांगोला पोलिसांची कामगिरी, दहा मुली कुटुंबीयांच्या स्वाधीन

Solapur News : दोन कोटी रुपये खर्चून बेलाटीत उभारणार राम मंदिर; भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण

Pargaon News : पारगावमध्ये अग्नितांडव! इलेक्ट्रॉनिक गोडाऊनला भीषण आग; एक कोटीचे साहित्य खाक, रसाळ कुटुंबाचा १५ वर्षांचा संसार उघड्यावर

संतापजनक! दोन हफ्ते थकले, वसुली प्रतिनिधीनं मध्यरात्री कर्जदाराच्या पत्नीला केला कॉल; म्हणे, तुझी आठवण आली

SCROLL FOR NEXT