कोल्हापूर

सीटबेल्ट नाही शोभेला...जीव वाचवेल अपघाती प्रसंगाला

CD

सीटबेल्ट नाही केवळ शोभेला...
कोल्हापुरात सीटबेल्टबाबत विशेष अभियान : सायबर चौक अपघातानंतर कारवाईला वेग
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ : ‘मोटारचालकाने सीटबेल्टचा वापर करावा’ हा मूळ नियम असला तरी सीटबेल्टविषयी येथील मोटारचालकांचे साफ दुर्लक्ष दिसून येते. सोमवारी सायबर चौकात झालेल्या मोटार अपघातानंतर शहर वाहतूक शाखेने कारवाईची मोहीम तीव्र केली. मागील पाच महिन्यांत विना सीटबेल्ट मोटार चालविणाऱ्या ११४३ चालकांना दोन लाख २८ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. परंतु, मोटारचालकांमध्ये याविषयी गांभीर्य दिसून येत नाही.
चालकासह सहप्रवाशांचा सुरक्षेसाठी असणाऱ्या सीटबेल्टकडे साफ दुर्लक्ष होते. या कारणाने देशभरात दरवर्षी लाखो लोकांना प्राण गमवावे लागतात. सायबर चौकात सोमवारी भरधाव मोटारीने चार वाहनांना उडवले. चालकाचे नियंत्रण सुटलेल्या वेगवान मोटारीने तिघांचा जीव घेतला. तर सात जण जखमी झाले. या अपघातात चालक व्ही. एम. चव्हाण यांनाही प्राण गमवावा लागला आहे. या अपघातानंतर शहर वाहतूक शाखेने कारवाईची मोहीम तीव्र केली आहे.
...
पाच महिन्यांत दोन लाखांचा दंड
सीटबेल्ट न लावता मोटार चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. जानेवारी ते मे या कालावधीत एकूण ११४३ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन लाख २८ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे, परंतु यानंतरही सीटबेल्ट लावणाऱ्यांची संख्या तशी अल्पच म्हणावी लागेल.
...
सीटबेल्ट लावण्याचे फायदे....
सीटबेल्ट लावल्याने अपघाती मृत्यूची शक्यता ५० टक्केपर्यंत कमी होते. चालकाचा तोल सांभाळला गेल्याने डोके, छाती यांचे रक्षण होते. मानेसारखा अवयव धक्क्यापासून बचावला जातो. गडबडीच्यावेळी अचानक ब्रेक लावल्याने चालकाला त्वरित मोटारीवर नियंत्रण मिळवता येते. एअरबॅग उघडण्यास वेळ मिळून चालकाचा बचाव होतो.
...

‘अपघातावेळी चालकाने सीटबेल्ट लावला असेल तर त्याला कमीत कमी दुखापत होते. तसेच त्याला वाहनावर पुन्हा नियंत्रण मिळवता येते. अनेक अपघातात चालक, प्रवासी दूरवर फेकले जाण्याचे प्रसंग घडतात. पण, सीटबेल्टमुळे असे होत नाही. प्रत्येक चालकाने सीटबेल्टचा वापर करणे बंधनकारक असल्याने याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
मनोज पाटील, पोलिस उपनिरीक्षक
...
कारवाई कालावधी ः जानेवारी ते मे २०२४
सीटबेल्ट कारवाई ः ११४३
वसूल केलेला दंड ः २,२८,६०० रु.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT