कोल्हापूर

कसबा वाळवे

CD

89076
कसबा वाळवे ः रघुनाथ न्यू इंग्लिश स्कूल व माहिती आणि प्रसार मंत्रालयातर्फे प्लास्टिकमुक्तीसाठी कापडी पिशव्यांचे वाटप करताना शिवराज पाटील शेजारी शिक्षक व विद्यार्थी.
....
रघुनाथ न्यू इंग्लिश स्कूलमध्ये
पर्यावरणविषयक निबंध स्पर्धा

कसबा वाळवे, ता. ९ ः येथील वाळवा एज्युकेशन सोसायटी संचलित रघुनाथ न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये माहिती आणि प्रसार मंत्रालय, भारत सरकार, केंद्रिय संचार ब्यूरो कोल्हापूर यांच्यातर्फे नुकताच जागतिक पर्यावरण दिन साजरा केला.
यानिमित्त पर्यावरणविषयक निबंध स्पर्धा घेण्यात आली. तसेच प्लास्टिक वापरविषयक दुष्परिणाम याबाबत केंद्रीय संचार ब्यूरोचे प्रमोद खांदीकर, डी. पी. निळपणकर, पारकर यांनी पर्यावरण जनजागृती यावर मनोगत व्यक्त केले. पर्यावरणसंबंधी घेतलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वाटप करण्यात आली. शालेय परिसर स्वच्छता व आर. बी. कुंभार व विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
एस. व्ही. पाटील यांच्या हस्ते शाळा परिसरातील दुकानदारांना प्लास्टिकमुक्तीसाठी पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचे वाटप केले. यावेळी विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. कार्यक्रमाला संस्थेचे सचिव शिवराज पाटील, पर्यवेक्षक मांडवकर, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. अजय पाटील यांनी आभार केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Rain Forecast : विदर्भात पावसाचा जोर वाढणार ; चक्रीवादळाचा प्रभाव, २४ सप्टेंबरनंतर मुसळधारेची शक्यता

FDA Action: 'सुलेमान मिठाईवाला'वर बडगा! मुंबईतील १० आस्थापनांचे परवाने एफडीएकडून निलंबित

Asian Games 2026 : भारतीय नौकानयनपटू 'संपावर' जाण्याच्या तयारीत! जपानमध्ये खेळाडूंकडून बंडाची भूमिका; नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : गंगाखेड तालुक्यात गांजाची लागवड, ७६.९६ लाखांचा माल जप्त

Koyna Dam Water Release : कोयना धरणातून 3983 क्युसेक विसर्ग; कृष्णा नदीची पातळी वाढणार, आज सायंकाळपर्यंत पाणी पोहोचणार सांगलीत

SCROLL FOR NEXT