कोल्हापूर

शोधवृत्त ः ज्येष्ठ कलाकार मानधन

CD

लोगो
सकाळ इनव्‍हेस्‍टिगेशन

मानधन वाढले, वाढली बनावचगिरीही
टोळक्यांना आवरणार कोण ? साहित्यिक-कलाकार मानधन सन्मान योजनेची स्थिती

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ : राज्य शासनाच्या राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेतून आता राज्यभरातील ज्येष्ठ कलाकारांना सरसकट पाच हजार रुपये मानधनाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र, वाढलेल्या मानधनाबरोबरच त्यातील बोगसगिरीही वाढू लागली आहे. खऱ्या आणि गरजू कलाकारांपेक्षा सग्यासोयऱ्यांना मानधनाचे प्रस्ताव वाढत असून, बनावट पत्रे व पुरावे देणारे एक टोळकेही कार्यरत झाले आहे.

चौकट
काय आहे योजना...
मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार सरसकट सर्व कलाकारांना पाच हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय झाला असून, १ एप्रिलपासून या शासन निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राज्य शासनाकडून १९५४-५५ पासूनही योजना राबवली जाते. यापूर्वीच्या निकषांनुसार कलावंत व साहित्यिकांना ‘अ’ श्रेणी तीन हजार सातशे,‘ब'' श्रेणी दोन हजार सातशे, ‘क'' श्रेणी दोन हजार दोनशे पन्नास रुपये असे मानधन दिले जात होते. आता नवीन निर्णयानुसार एकरकमी पाच हजार रुपये मानधन लाभार्थ्यांना डीबीटी प्रणालीद्वारे अदा केले जात आहे. पन्नास वर्षांवरील कलाकार व साहित्यिकांना हयात असेपर्यंत हे मानधन मिळणार आहे. एकदा कागदपत्रे सादर केल्यानंतर आजीवन कोणतीही कागदपत्रे देण्याची गरज नसून, केवळ दरवर्षी हयातीचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर यापूर्वी दोन हजार आठशे कलाकार, साहित्यिकांना या योजनेचा लाभ मिळतो तर आणखी पाचशे जणांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत.

चौकट
अशी राबते यंत्रणा...
योजनेतून लाभ मिळवून देतो म्हणून काही टोकळी सध्या कार्यरत झाली आहेत. पंधरा वर्षे काम केल्याच्या पुराव्यासाठी आवश्यक बनावट कागदपत्रे ही टोळकी तयार करून देतात आणि अगदी पाचशे रुपयांपासून पाच हजारांपर्यंतची रक्कम संबंधितांकडून घेतात. नोंदणीकृत नसलेल्या संस्थांचकडूनही अनुभवाची पत्रे देण्याचे प्रकार वाढले आहेत. मानधन समिती फक्त ही कागदपत्रे पाहून प्रस्ताव पुढे पाठवते. कागदपत्रांची फारशी शहानिशा केली जात नाही. मुळात संबंधितांना समितीने बोलवून घेऊन त्यांच्याकडून सर्व माहितीही जाणून घ्यायला हवी. अंथरुणावर असणाऱ्यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन पाहणी करायला हवी. मात्र, अशा कुठल्याच गोष्टी होत नाहीत. याबाबत काही संघटनांनी आक्षेप घेऊनही कोणतीच कार्यवाही होत नाही, हे वास्तव आहे.
--
कोट
गेल्या तीस वर्षांपासून खऱ्या कलाकारांना न्याय मिळावा, यासाठी संघटनात्मक काम करत आहे. अलीकडच्या काळात मानधनासाठी प्रस्तावही वाढू लागले आहेत. कोल्हापूरसाठी प्रत्येक वर्षाला नवीन साठ प्रस्ताव सादर करता येत होते. मात्र, आता ही संख्या वर्षाला शंभर इतकी झाली आहे.
- विलास पाटील

कोट
योजनेतून समाजातील खऱ्या आणि गरजू कलाकारांना सर्वांत अगोदर प्राधान्यक्रम द्यावा. प्रस्तावाची फाईल सादर केल्यानंतर सर्व कागदपत्रांची काटेकोरपणे तपासणी करावी. आवश्यकता वाटल्यास संबंधितांच्या घरी जाऊनही परिस्थिती पाहून निर्णय घेणे आवश्यक वाटते.
- पद्माकर कापसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant: हा देश अंबानीच्या मुलाच्या वडिलांचा…; महादेवीसाठी कुणाल कामरा मैदानात, नव्या ट्विटनं पुन्हा अडचणीत येणार?

Yashasvi Jaiswal Century: जैस्वालची सुरुवात अन् शेवटही शतकाने! इंग्लंडच्या गोलंदाजांना चोपत मोठ्या विक्रमालाही घातली गवसणी

Jaykumar Gore : पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाडचे नेते नसुन देशाचे नेते आहेत, त्यांनी केलेल वक्तव्य हे त्यांना उशीरा सुचलेले शहानपण

ENG vs IND: 'बुमराह असो वा नसो, आमचं काम...', प्रसिद्ध कृष्णा जस्सीच्या न खेळण्यावर नेमकं काय म्हणाला?

Latest Maharashtra News Updates Live: पाचोर्‍यातील कृष्णापुरीतील उपद्रवी माकडाला पकडण्यात यश

SCROLL FOR NEXT