कोल्हापूर

दिव्यांग पेन्शन सहा हजार रुपये करा

CD

94366
कोल्हापूर : दिव्यांग व्यक्तींच्या विविध समस्यांसंदर्भातील निवेदन शिवसंग्राम संघटनेने मंगळवारी प्रशासनाला दिले. निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी हे निवेदन स्‍वीकारले.


दिव्यांग पेन्शन
सहा हजार करा
शिवसंग्राम संघटनेची मागणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : दिव्यांग व्यक्तींना संजय गांधी पेन्शन दिली जाते. सध्या या अंतर्गत पंधराशे रुपयांची रक्कम मिळते. ही रक्कम सहा हजार रुपये करावी, अशी मागणी शिवसंग्राम दिव्यांग संघटनेने केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी हे निवेदन स्‍वीकारले.
निवेदनात म्हटले आहे, दिव्यांग व्यक्तींना मिळणारी संजय गांधी पेन्शन ही तुटपुंजी आहे. वाढती महागाई लक्षात घेता ही रक्कम सहा हजार रुपये करावी, दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी, तसेच त्यासाठी जाचक अटी ठेवू नयेत, दिव्यांग व्यक्तींच्या पेन्शनचे प्रस्ताव धूळ खात पडले आहेत, ते विनाअट तातडीने मंजूर करून त्यांना पेन्शन लागू करावी, शहरी आणि ग्रामीण भागांत दिव्यांग व्यक्तींना घरफाळ्यात आणि गॅस सिलिंडरमध्ये ५० टक्के सवलत द्यावी, या मागण्यांचा प्राधान्याने विचार करून त्या मंजूर कराव्यात. अन्यथा, आंदोलन करू. शिष्टमंडळात अनिल मिरजे, किरण वाळे, विजय शेंडे, अनिल कामत, अंकुश पाटील, हायाज शेख, शेखर वडणगेकर, दीपाली पाटील, पल्लवी महाडिक, जागृती पाटील, रेखा पाटील, माया पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Traffic : वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनांकडून टोल घेऊ नका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सूचना

Who is Arshad Khan? मुंबई इंडियन्सने पहिली संधी दिली अन् तो आता गुजरात टायटन्ससाठी ठरतोय एक्स फॅक्टर; RCB लाही दिलाय त्रास

Central Railway: मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक, लोकल सेवा पूर्ण बंद राहणार, मेल गाड्यांनाही फटका बसणार; कधी आणि कुठे?

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये ग्रामपंचायतीचा अभिनव निर्णय; विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना घरपट्टी माफी

Thane: ‘घोडबंदर’चा बोजा ठाणे पालिकेवर, देखभालीसाठी अडीच कोटींचा खर्च

SCROLL FOR NEXT