कोल्हापूर

पाऊस बातमी

CD

94391, 94390,
...
धरणातील पाणी साठा वाढला, नऊ बंधारे पाण्याखाली
शहर परिसरातही पावसाचा जोर कायम : रोप लावणीच्या कामाची लगबग
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाची दमदार सुरुवात झाली. गेल्या आठ दिवसांपासून धरणक्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. आज शहर आणि परिसरातही पावसाचा जोर कायम राहिला. धरणातील पाणीसाठी दिवसागणिक वाढू लागला आहे. जिल्ह्यातील ९ बंधारे पाण्याखाली गेले असून, राजाराम बंधारा येथे रात्री आठ वाजता नदीची पाणी पातळी २० फूट ६ इंच इतकी नोंदवण्यात आली. पावसाचा जोर असल्याने शेतात रोप लावणीच्या कामाची लगबग सुरू आहे.
मॉन्सूनचे आगमन लवकर होणार असून, यंदा शंभर टक्के मॉन्सूनचा पाऊस पडेल, असा अंदाज मे महिन्याच्या शेवटी वेधशाळेने वर्तवला होता. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाची प्रतीक्षा होती. जून महिन्याच्या शेवटी पावसाला सुरुवात झाली. जुलै महिन्याच्या प्रारंभीच पावसाने दमदार सुरुवात केली. धरणक्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे नद्यांची पाणी पातळी वाढली असून, अनेक ठिकाणी पाणी पात्राबाहेर आले आहे. शहरातही दिवसभर पावसाने आपला खेळ सुरूच ठेवला होता. पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर दिवसभर कमी अधिक स्वरूपात पाऊस पडत होता. पहाटे पाच वाजता पंचगंगेची पाणी पातळी १८ फूट होती. सातनंतर नदीच्या पाणी पातळीत वाढ होत गेली. रात्री आठ वाजता नदी २० फूट ६ इंच इतकी होती. आज राधानगरी धरणातून अकराशे क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
...
शुक्रवारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता
शुक्रवारी (ता. ५) नक्षत्र बदलत असून, तरणा नक्षत्र सुरू होत आहे. हत्ती हे वाहन असून, त्यानंतर पावसाचे प्रमाण वाढेल, असा अंदाज आहे.
...
धरणातील पाणीसाठा
जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा (टीएमसीमध्ये) पुढीलप्रमाणे : राधानगरी २.६५, तुळशी १.३५, वारणा १२.१९, दूधगंगा ४.७३, कासारी ०.९५, कडवी १.२९, कुंभी ०.९२, पाटगाव १.६७, चिकोत्रा ०.५१, चित्री ०.५९, जंगमहट्टी ०.५१, घटप्रभा १.५५, जांबरे ०.५९, आंबेआहोळ ०.८०, सर्फनाला ०.०६ व कोदे लघु प्रकल्प ०.१० इतका पाणीसाठा आहे.
...
हे बंधारे पाण्याखाली
शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी व तेरवाड, कासारी नदीवरील यवलूज, वारणा नदीवरील चिंचोली व माणगांव असे ९ बंधारे पाण्याखाली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OCI Card New Rule: नागरिकत्व नियमांत मोठा बदल! अल्पवयीन मुलांच्या पासपोर्टवर मोठी बंदी; OCI साठी नवे डिजिटल नियम लागू

Navi Mumbai Drug Racket : शांताबाई करंडेकर टोळीचा गेम ओव्हर! दिघ्यात लेडी डॉनचं साम्राज्य उद्ध्वस्त करत पोलिसांनी अवैध मालमत्तेवर फिरवला बुलडोझर

Latest Marathi News Live Update : बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सेंटर सुरू, रुग्णांना मोठा दिलासा

Mumbai: प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरूच! प्लॅटफॉर्म- लोकलमधील अंतराचा धोका; अनेक स्‍थानकांवर उपाययोजनांकडे दुर्लक्ष

महिन्यात राज्यभरात १४ भोंदूबाबांवर गुन्हे, खरात प्रकरणानंतर प्रकार उघड

SCROLL FOR NEXT