कोल्हापूर

दुधगंगा धरणाची गळती कधी काढणार ? : महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन

CD

94434
...
दूधगंगा धरणाची गळती कधी काढणार ?
इरिगेशन फेडरेशनची विचारणा : पाटबंधारे विभागाला विविध मागण्यांचे निवेदन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : दूधगंगा (काळम्मावाडी) धरणाच्या गळतीबाबत सध्या काय परिस्थिती आहे. गळती काढण्याचे काय नियोजन केले असून, ती कधी काढणार? अशी विचारणा महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या शिष्टमंडळाने आज येथे पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे व कार्यकारी अभियंता स्मिता माने यांना निवेदनाद्वारे केली.
फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने हे निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे, दूधगंगा धरणात मागीलवर्षी ज्याप्रमाणे पाणी साठा केला होता, त्याचप्रमाणे यावर्षीही करावा. जेणेकरून पुढे शेतीसाठी पाण्याची कमतरता भासणार नाही. दूधगंगा धरणाच्या गळतीबाबत सध्या काय परिस्थिती आहे, याबाबत माहिती मिळावी. धरणाच्या सुरक्षेच्यादृष्टीने गळती काढण्याचे काम कधी सुरू केले जाणार आहे, त्यासाठी किती कालावधी लागणार आहे, यावर्षी किती टीएमसी पाणीसाठा करणार आहे, याची माहिती जाहीर करावी. यावर्षी दूधगंगा धरणाची गळती काढण्याचे काम सुरू करणार असाल तर दूधगंगा व पंचगंगा काठावरील शेतकऱ्यांना पाणी पुरणार का, याबाबत माहिती मिळावी. यावर्षी जर दूधगंगा धरणाची गळती काढण्यासाठी पाणी सोडणार असल्यास ते पहिल्यांदा गैबी बोगद्यातून पंचगंगा नदीत सोडावे, त्यामुळे राधानगरी धरणातील पाणी शिल्लक राहील‌. पाण्याच्या नियोजनाबाबत माहिती प्रसिध्द करावी, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होणार नाही आणि त्याप्रमाणे शेतकरी पिकाचे नियोजन करतील.
शिष्टमंडळात मारुती पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, चंद्रकांत पाटील-पाडळीकर, सुभाष शहापुरे, आर‌. के. पाटील, सखाराम चव्हाण, आदींचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

भारतात सोन्याचं दर कमी होणार? RBI ने देशात परत आणलं १०४ टन सोनं

Latest Marathi News Live Update : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्यावर लांबच लांब रांगा

Fuel Price Hike India : पेट्रोल-डिझेल प्रति लिटर 4 ते 5 रुपये, तर एलपीजी सिलिंडर 50 रुपयांनी महागणार? पुढील 5 ते 7 दिवसांत सरकार घेणार निर्णय!

RR vs DC Live: फुलटॉसवर यशस्वी गेला अन् भन्नाट यॉर्करने वैभव सूर्यवंशीचा त्रिफळा उडवला; Kyle Jamieson चे सेलिब्रेशन पाहा Video

SCROLL FOR NEXT