मंगळवार, शिवाजी पेठेत
आज कमी दाबाने पाणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : चंबुखडी येथील पाईपलाईनला जोडलेल्या क्रॉसलाईनच्या जॉईंटमधून गळती होत आहे. या ठिकाणी महापालिकेकडून दोन दिवसांपासून दुरुस्तीचे काम सुरू आहे. परिणामी थेट पाईपलाईन योजनेचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मंगळवारीही शिवाजी पेठ व मंगळवार पेठ परिसरात अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा झाला. बुधवारीही (ता.३) कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. गुरुवार (ता. ४) पासून पाणी पुरवठा पूर्ववत होईल, अशी माहिती जलअभियंता हर्षजित घाटगे यांनी दिली.
काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेची पाईपलाईन चंबुखडी येथील क्रॉसलाईनला जोडण्याचे काम पूर्ण झाले आहे. परंतु जॉईंटमधून पाणी गळती होत आहे. ती काढण्यासाठी दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्याचबरोबर थेट पाईपलाईनच्या वीज पुरवठ्यास अडथळा ठरणारे घटक हटविणे आदी कामासाठी गेल्या दोन दिवसांपासून थेट पाईपलाईन योजनेचा पाणीपुरवठा बंद केला आहे. तसेच पर्यायी बालिंगा, शिंगणापूर योजना सुरू करण्यासाठीचे टेस्टिंगचे कामही दोन दिवसांपासून पाणीपुरवठा विभागाने हाती घेतले आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. विशेषत: मंगळवार पेठ व शिवाजी पेठ परिसरात कमी दाबाने व अपुरा पाणी पुरवठा सुरू आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.