कोल्हापूर

महावितरण

CD

‘बॅन’ वीज मीटर्सच्या वापरातून ग्राहकांची लूट
महावितरण चिडीचूप ः वर्षाकाठी एक कोटींचा फटका, ३० टक्के ग्राहकांकडे सदोष मीटर्स
शिवाजी यादव ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ ः महावितरण कंपनीने दहा वर्षांपूर्वी बसवलेली ‘रोलेक्‍स’ व ‘फ्लॅश’ कंपनीची वीज मीटर्स सदोष असल्याचे चार वर्षांपूर्वी उघड झाले. दोन्ही मीटर्स महावितरण कंपनीने ‘बॅन’ केली. त्या ऐवजी नवीन मीटर्स महावितरणने बसवणे सुरू केले. असे असले तरी अद्यापि ३० टक्के ग्राहकांकडे त्याच सदोष मीटर्सचा वापर सुरू आहे. सदोष मीटर्सच्या गतिमान रीडिंगमुळे बहुतेक ग्राहकांना दोन ते वीस रुपये जादा बिल भरावे लागते. तर मीटर्स ‘जाम’ झाल्यास महावितरणला तोटा सोसावा लागतो. अशा दुहेरी तोट्याची वर्षाकाठची रक्कम एक कोटी दहा लाखांच्या घरात जाणारी आहे. याबद्दल महावितरण मात्र चिडीचूप आहे.
महावितरण कंपनीने २०१५ पूर्वी वीज ग्राहकांना रोलेक्स व फ्लॅश सिंगल फेज मीटर्स घरगुती ग्राहकांना बसविली. ५.३० ॲम्पीयर क्षमतेची मीटर्स आहेत. त्याची तपासणी महावितरण प्रयोगशाळेतून झाली होती. अशा मीटर्समधून दीड दोन वर्षाने जादा युनिट पडू लागले, त्या ग्राहकांची बिले जादा येऊ लागली. ज्यांची मीटर्स जाम झाली, कमी वेगाने फिरली त्यांची बिले कमी येऊ लागली. अशा बिलांच्या तक्रारी वाढल्यानंतर महावितरण कंपनीच्या तपासणीत मीटर्स सदोष असल्याचे उघड झाले. दोन्ही कंपनीचे मीटर्स बॅन केली. त्याऐवजी जुनी मीटर्स बदलून नवीन स्मार्ट मीटर बसवणे महावितरणने सुरू केले. यातही ज्यांची मीटर्स बंद पडतात, त्यांची मीटर्स बदलली जात आहेत.
गेल्या चार वर्षांत जिल्ह्यात ६५ टक्के ग्राहकांची मीटर्स बदलली. अद्यापि ३० ते ३५ टक्के ग्राहकांकडे जुनीच मीटर्स आहेत. मीटर जाम झाल्यास महावितरणचा तोटा व जास्त वेगाने फिरल्यास वीज ग्राहकांचा तोटा होतो. घरगुती वीज ग्राहकाला साधारण चार रूपयेपर्यंत युनिट वीज दर आहे. सदोष मीटरमधून दोन ते पाच युनिट जादा वीजभार मोजला गेल्यास ८ ते २० रुपये जादा बिल भरावे लागते. ९८ टक्के ग्राहक एकदाच मीटर बसवलेले मीटर्स बंद पडेपर्यंत तपासत नाहीत. त्यामुळे जे सध्‍या कार्यरत मीटर्स आहे, तेच अचूक आहे असे गृहीत धरून वीज बिले भरतात. यातच ग्राहकांची फसवणूक होते.
महावितरणची घरगुती ग्राहक संख्या ९ लाख २३ हजार आहे. यातील जवळपास अडीच लाख ग्राहकांकडे जुनीच मीटर्स आहेत. त्यांचे किमान एका युनिटचा वीज वापर मीटर्सने जादा दाखवला तरी वर्षभराची रक्कम एक कोटी १० लाखांच्या घरात जाते. अशी लूट होत असूनही महावितरणने ‘ब्र’ ही काढलेला नाही.
...

नवा स्टॉक येतो ५०० ते ३०० मीटर्सचा
सात वर्षींपूर्वी एक हजारांवर घरगुती मीटर्स कोल्हापूर परिमंडलास येत होती. सध्‍या ५०० ते ३०० मीटर्सचा नवा स्टॉक येतो. त्यामुळे ग्राहकांची जुनी मीटर्स अद्यापि शंभर टक्के बदलली नाहीत. ज्यांची मीटर्स बंद पडली, त्यांचीच मीटर्स प्राधान्याने बदलेली आहेत. त्यामुळे अद्यापी ३० ते ३५ टक्के मीटर्स जुनीच वापरात आहेत, अशी माहिती महावितरणच्या प्रयोगशाळेतून देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: वैभव सूर्यवंशीचं अखेर पदार्पण झालं, पण कोणाला मिळाला संघातून डच्चू? पाहा भारत-इंग्लंडची Playing XI

Women Farmers Lead: भिवधानोरा गावातील शेतकरी महिलांची जलसंधारण, सेंद्रिय शेती व सामूहिक खरेदीत आदर्श कामगिरी; पाणी फाउंडेशन स्पर्धेत उठून दिसले योगदान

Latest Marathi Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

School Flooding: पहिल्याच पावसात अगरकानडगाव जि.प. शाळा जलमय; विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात, कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी शिरसाट यांची पाहणी

Mumbai Rain: पावसाने उघड केलं विकासाचं वास्तव! मुंबईत झाडं कोसळली, रस्ते वाहून गेले, मिसिंग लिंकवर खड्ड्यांचं साम्राज्य

SCROLL FOR NEXT