कोल्हापूर

मोबदला न मिळाल्यास रस्ता बंद करणार

CD

मोबदला न मिळाल्यास रस्ता बंद करणार
कोळिंद्रे ग्रामस्थांचा इशारा : कार्यकारी अभियंत्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ५ : उचंगी प्रकल्पासाठी कोळिंद्रे (ता. आजरा) येथे प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन केले आहे. येथे नवीन वसाहत तयार केली आहे. या वसाहतीसाठी जमिनीतून रस्ता दिला आहे. पण, त्याचा अद्याप मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे रस्ता बंद करण्याचा इशारा कोळिंद्रचे ग्रामस्थ भानुदास पाटील यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन दूधगंगा कालवा विभाग कोल्हापूर (लघुपाटबंधारे विभाग उचंगी) चे कार्यकारी अभियंता यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे, लघु पाटबंधारे विभाग उचंगी अंतर्गत मौजे कोळिंद्रे यथे नवीन वसाहतीकडे जाण्यासाठी जमिनीतून (गट क्र. १५० \अ) रस्ता दिला आहे. दोन वर्षांपूर्वी रस्ता बनवला आहे. तो बनवण्यासाठी संपादित केलेल्या जागेचा मोबदला आजअखेर मिळालेला नाही. २०२२ पासून याबाबत विचारणा करूनही प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. १५ जुलैपर्यंत याबाबतचा मोबदला न मिळाल्यास जागा ताब्यात घेऊन रस्ता बंद केला जाईल. यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीला जबाबदार राहाल, असेही म्हटले आहे. निवेदनावर भानुदास विष्णू पाटील यांची सही आहे. जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलिस निरीक्षक यांना माहितीसाठी प्रत दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : शिरूरमध्ये गोळीबाराचा थरार; हरी गंगावणे यांचा मृत्यू, CCTV फुटेज समोर

UPI MDR Charge: UPI पेमेंटवर चार्ज लागू झाला तरी हे 6 UPI व्यवहार फ्री! एक रुपयाही चार्ज नाही; जाणून घ्या कोणते

IND vs PAK Asian Games : श्रेयस अय्यरचा संघ आशियाई स्पर्धेत पाकिस्तानला भिडणार? जाणून घ्या हा महामुकाबला केव्हा होणार

Marathi News Live Updates : शिरूरच्या आंबेडकर नगरमध्ये गोळीबार; दुचाकीवरून जात असलेल्या तरुणावर झाडल्या गोळ्या

Tukaram Mundhe:तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांमधील भरमसाठ बिलांचा पर्दाफाश तुमची कशी होतेय लूट?

SCROLL FOR NEXT