कोल्हापूर

विभागीय क्रीडा संकुलाचे काम मार्गी लावू ः मुश्रीफ

CD

विभागीय क्रीडा संकुलाचे
काम मार्गी लावू ः मुश्रीफ

जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत ग्वाही

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः ‘विभागीय क्रीडा संकुलाचे काम मार्गी लावू. याबाबत क्रीडा क्षेत्रातील सुधारणांसाठी क्रीडा संघटनांच्या प्रतिनिधींनी सूचना कराव्यात. विधानसभेच्या अधिवेशनानंतर संकुलाच्या पाहणीसह बैठक आयोजित करा,’ अशी सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. जिल्हा नियोजन मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
पाच जिल्ह्यांसाठी असलेल्या विभागीय क्रीडा संकुलाचे काम संथगतीने सुरू आहे. झालेली कामे अपुरी, दर्जाहीन आहेत. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. आतापर्यंत झालेल्या कामांचा आढावा उपसंचालक माणिक पाटील यांनी मांडला. यानंतर निमंत्रित सदस्य हिंदकेसरी दीनानाथ सिंह, प्रा. अमर सासने, प्रकुल मांगोरे-पाटील यांनी त्रुटी, आवश्‍यक कामांबाबतच्या सूचना केल्या. संकुलामध्ये मातीचा आखाडा व्हावा, ज्येष्ठ वस्ताद व मल्लांच्या मानधनात वाढ करावी, तज्ज्ञ प्रशिक्षकांची नेमणूक करावी, सिंथेटिक ट्रॅक व्हावा, संकुलाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्यावे, संकुलाला मॅटही द्यावा, अशा सूचना मांडल्या. याबाबत पालकमंत्र्यांनी प्रस्ताव देण्याची सूचना केली.
बैठकीस खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा क्रीडाधिकारी नीलिमा आडसूळ, तालुका क्रीडा अधिकारी सचिन चव्हाण, सुधाकर जमादार, स्नेहल पाटील, शाम जाधव आदी उपस्थित होते.
......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain Forecast In Maharashtra : पर्जन्यमानात सुधारणा! महाराष्ट्रात पावसाला वेग येणार; २३ जूननंतर राज्यभर सर्वदूर पाऊस, IMD चा अंदाज

Reliance Success Story: फुटबॉल मैदानावरील बैठक अन् बदललं अंबानींचं नशीब! कसं उभं राहिलं रिलायन्सचं 18 लाख कोटींचं साम्राज्य?

Latest Marathi Live Updates: सीमा प्रश्नावरून महाराष्ट्र एकीकरण समितीला कर्नाटकात अडवले, ठिय्या आंदोलन

मृत डॉ. शिरीष वळसंगकरांच्या घरातील भांडण पोलिस ठाण्यात! रुग्णालयावरील घरात राहण्यावरून डॉक्टरांचे जावई अन्‌ सून डॉ. शोनाली यांच्यात वाद; सदर बझार पोलिसांत तक्रारी

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २० जून २०२६ ते २६ जून २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT