Rain Forecast In Maharashtra : पर्जन्यमानात सुधारणा! महाराष्ट्रात पावसाला वेग येणार; २३ जूननंतर राज्यभर सर्वदूर पाऊस, IMD चा अंदाज

Maharashtra Rain Forecast : पर्जन्यमानात सुधारणा होण्याची चिन्हे दिसत असून २३ जूननंतर महाराष्ट्रात पावसाला वेग येण्याची शक्यता आहे. राज्यातील बहुतांश भागात सर्वदूर पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
Rain Forecast In Maharashtra imd monsoon update

Rain Forecast In Maharashtra imd monsoon update

esakal

Updated on

Maharashtra rain forecast after June 23 : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरातील अनेक भागांत मॉन्सूनची वाटचाल मंदावली असून, पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना २३ जूननंतर दिलासा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अरबी समुद्रावरील मॉन्सूनचे प्रवाह कमकुवत झाल्याने आणि आवश्यक कमी दाबाच्या प्रणालींचा अभाव असल्यामुळे पावसाचा वेग मंदावला आहे. मात्र, विषुववृत्तीय भागातून येणारे वारे (क्रॉस इक्वेटोरियल फ्लो) हळूहळू मजबूत होत असून, त्याचा परिणाम पश्चिम किनारपट्टीवरील पर्जन्यमानावर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com