कोल्हापूर

बहिणींची बँक खातीच नाहीत

CD

दोन लाख ‘लाडक्या बहिणीं’ची बँक खातीच नाहीत
जिल्हा परिषदेची वाढणार डोकदुखी; प्रत्येक पात्र महिलांना द्यावा लागणार लाभ

सुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील महिलांना लाभ दिला जाणार आहे. ही जबाबदारी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत गावागावांत पोहोचवली जात आहे. मात्र, जिल्ह्यातील सुमारे दोन लाखांहून अधिक महिलांची बँक खातीच नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पात्र महिलांना लाभ देण्यासाठी आणि त्यांची नव्याने बँक खाती सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाची डोकेदुखी वाढणार आहे.
योजनेंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील महिलांना प्रत्येक १ हजार ५०० रुपये देण्याची घोषणा केली आहे. ही योजना यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडे जबाबदारी सोपवली आहे. यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेची सर्व यंत्रणा गतिमान केली आहे. राज्य शासन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून या योजनेच्या अंमलबजावणीची माहिती घेत आहे. जिल्ह्यातील नियमानुसार पात्र होणाऱ्या प्रत्येक महिलेला याचा लाभ मिळाला पाहिजे, असा शासनाचा आग्रह आहे. सध्या ज्या महिलांची बँक खाती आहेत, ज्यांची योग्य ती कागदपत्रे आहेत. शासनाच्या नियम आणि निकषाप्रमाणे सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे अशा महिलांची हा लाभ मिळविण्यासाठी झुंबड उडाली आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील अनेक गरीब किंवा मध्यम वर्गीय कुटूंबातील महिलांची बँक खातीच सुरू केलेली नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात केडीसीसी, राष्ट्रीयकृत, नागरी बँकांच्या एकूण ३१९ शाखा आहे. पुरुषांची खाती सर्वाधिक आहे. बँक खाती नसलेल्या महिलांना लाभ देण्यासाठी महिला व बाल कल्याण विभागाला ही खाते सुरू करण्यासाठी पर्याय द्यावा लागणार आहे.

चौकट
माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत ज्यांची बँक खाती आहेत त्यांना लाभ देण्यासाठी यंत्रणा गतिमान केली आहे. ज्या महिलांची बँक खाती सुरू केलेली नाहीत, अशा महिलांना पोस्ट बँकेचा पर्याय देण्याबाबत चर्चा झाली आहे. पोस्ट बँकेत एका दिवसात आणि घरात जाऊन बँक खाती सुरू केली जातात. त्यामुळे पोस्ट बँकेचा पर्याय चांगला आहे.
- शिल्पा पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी,
महिला व बाल कल्याण समिती, जिल्हा परिषद, कोल्हापूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jan Shatabdi: जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड, 3 तासांपासून एकाच ठिकाणी ठप्प; प्रवाशांचा खोळंबा

Vaishanavi Girse : पुण्यात आणखी एका 'वैष्णवी', सासरच्या छळाला कंटाळून इंजिनिअर तरुणीने स्वत:ला संपवलं

Gold Rate Today: सोन्याचे भाव कोसळले! सलग चौथ्या दिवशी मोठी घसरण; तुमच्या शहरात आता किती भाव?

Marathi News Live Updates: ९० दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सोलापुरात परतीच्या पावसाची हजेरी, पहाटेपासून शहरात पावसाची संततधार

Karad Encroachment : कऱ्हाडच्या वारुंजी फाट्यावर पहाटे अतिक्रमणावर हातोडा; महामार्गालगतची सहा व्यावसायिक खोकी जेसीबीने जमीनदोस्त

SCROLL FOR NEXT