Kolhapur Rain Update esakal
कोल्हापूर

Kolhapur Rain Update: कोल्हापुरात पावसाची जोरदार बॅटिंग, चंदगड आणि करवीर तालुक्यात घरांची पडझड, एस. टी.च्या २७२ फेऱ्या रद्द

Pune Banglore Highway Flood update: पुणे-बंगळूर महामार्ग सेवा रस्त्यावर पाणी, एस. टी.च्या २७२ फेऱ्या रद्द

CD

चंदगड तालुक्यात सुंडी येथे प्रकाश देसाई यांच्या घराची भिंत पडून सुमारे तीस हजारांचे नुकसान झाले आहे. कोवाड येथील मसनु सुतार यांच्या शेतातील घराची भिंत पडून पस्तीस हजारांचे, तर कानूर बुद्रक येथील सुरेश नाईक यांच्या घराची भिंत कोसळून दहा हजारांचे नुकसान झाले.

(kolhapur flood update)

करवीर तालुक्यात १९ घरांच्या भिंती पडल्या

पावसामुळे घराच्या भिंती गरवून करवीर तालुक्यात दोन दिवसात १९ घरांच्या भिंती पडल्या आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. महसूल विभागाने पंचनामे केले असून ,सुमारे ९ लाखाचे नुकसान झाले आहे. तर एके ठिकाणी जनावरांचा गोठा जमीन दोस्त झाला आहे.

पुणे-बंगळूर महामार्ग सेवा रस्त्यावर पाणी

शिरोली पुलाची : संततधार पावसामुळे येथील सेवामार्गावर पाणी आले आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात पंचगंगा पुलापासून शिरोलीतील वाहतुकीसाठी सेवामार्ग बांधला आहे. रस्त्यावर आज रुक्मिणी मंगल कार्यालय ते पटेल हॉलदरम्यान पाणी आले. रस्त्यावर सुमारे दीड ते दोन फूट पाणी आहे.

बावडा ते शिये मार्गावर पाणी

पंचगंगा नदीला आलेल्या पुराचे पाणी कसबा बावडा ते शिये मार्गावर साधारण एक फुट पाणी आले आहे. या पाण्यातूनच धोकादायक वाहतून सुरू आहे. पावसाचा जोर कायम राहील्यास रात्री उशीरानंतर हा रस्ताही वाहतुकीसाठी बंद होण्याची शक्यता आहे.

एस. टी.च्या २७२ फेऱ्या रद्द

एस. टी. च्या दिवसभरात एकूण २७२ फेऱ्या रद्द केल्या. परिणामी राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाचे ३ लाख ७४ हजार २४२ रुपयांचे उत्पन्न बुडाले. गडहिंग्लज आगारातील सर्वाधिक ६०, चंदगड ५७, तर संभाजीनगर आगारातील ५२ फेऱ्यांचा त्यात समावेश राहिला. गगनबावडा आगाराचे सर्वाधिक १ लाख ११ हजार ६६० रुपये इतके उत्पन्न बुडाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT