कोल्हापूर

नवीन फौजदारी कायदा बदलावर मार्गदर्शन

CD

फोटो 07358

नवीन फौजदारी कायद्यावर
शिवाजी विद्यापीठात चर्चासत्र

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७ : नवीन फौजदारी कायदे व त्यातील बदल यावर शिवाजी विद्यापीठात विधी आधिविभागातर्फे शनिवारी घेण्यात आलेल्या चर्चासत्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सिनेट सभागृहामधील चर्चासत्रास ॲड. सूर्यकांत मिरजे, बी. एम. शास्री प्रमुख उपस्थित होते.
पूर्वीच्या आयपीसीमध्ये ५११ कलमे होती. पण, नवीन भारतीय न्याय संहितेमध्ये ३५८ कलमे व २० अध्याय आहेत. कालबाह्य कलमांचे उच्चाटन करून गरज असलेल्या नवीन कलमांचा समावेश केला आहे. दंगल, संघटित गुन्हेगारी, आर्थिक गुन्हे, दहशतवाद यांसारख्या गुन्ह्यांच्या विरोधात केलेल्या विशेष तरतुदी, व्याख्येची माहिती ॲड. मिरजे यांनी दिली. ॲड. शास्री यांनी भारतीय न्याय संहिता २०२३ याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी जुन्या व नव्या कायद्यांचे तुलनात्मक विश्लेषण करून नवीन कायदा हा पीडित यांना केंद्रस्थानी माणून तयार केल्याचे सांगितले. ॲड. दत्ताजी कवाळे यांनी तपासात तंत्रज्ञानाचा वाढता वापर, पीडितांच्या रक्षणाची व्यवस्था आणि एफ. आय. आर. प्रक्रिया सुरळीत करणे शून्य एफ. आय. आर. आणि ई-एफ. आय. आर. तरतुदींचा भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या महत्त्वाच्या तरतुदींमध्ये समावेशाबद्दलची माहिती सांगितली. श्रीकांत चौगुले यांनी मार्गदर्शन केले.
ॲड. प्रियांका गुरव, नागेश दरेकर, महेंद्र चव्हाण, महेश कांबळे, अरविंद पाटील, जयदीप कदम, अश्विनी पाटील, रोहिदास भांगरे, सुवर्ण कांबळे, स्नेहल गुरव, भिमसेन कांबळे उपस्थित होते. ॲड. शशिकांत कुरणे, प्रमोद दाभाडे यांनी सूत्रसंचालन केले. विधी विभागप्रमुख डॉ. विवेक धुपदाळे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: पूर्व वर्धमान जिल्ह्यातील गोपालदासपूर येथील 500 वर्ष जुन्या राखल राजा मंदिरात पोयला बैशाखची प्रार्थना करण्यासाठी भाविक दाखल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

SCROLL FOR NEXT