निवासी केंद्रासाठी एकत्र या...
---------
07403
07402
‘गिव्ह रिस्पेक्ट’ संस्कृतीला चालना मिळेल
एकेकाळी कोल्हापुरातील नवोदितांना दर्जेदार प्रशिक्षण देण्यासाठी क्रीडा प्रबोधिनी अंतर्गत फुटबॉल निवासी केंद्र सुरू झाले. मात्र, हे केंद्र कोल्हापुरातून का हलवले, याचा विचार प्रथम करावा लागेल. आता पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही. कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील फुटबॉलवेड्या खेळाडूंना राज्य शासनाच्या क्रीडा प्रबोधिनीतून सुविधा मिळू शकतात. यात एनआयएस प्रशिक्षकांची नेमणूक केली जाते. त्यांच्या प्रशिक्षणातच ‘गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट’ शिकवला जातो. हा पुढे खेळाडूंमध्येही त्यांच्याकडून शिकवला जातो. खेळात पंचांचा अनादर होऊ नये, खेळात शिस्त महत्वाची आहे. या केंद्रात फक्त मुलांना ऑफ सिझनमध्येसुद्धा दिवसातून तीन-तीन वेळा सराव घेतला जातो. एकूणच प्रशिक्षणाचेच वातावरण या केंद्रांमध्ये असते. आंतरराष्ट्रीय पातळीवरील फुटबॉल नियमांचे तंतोतंत पालन कसे करायचे, याचे धडेच दिले जातात. शास्त्रोक्त पद्धतीने परिपूर्ण खेळाडू घडविण्याचे काम येथे दिवसातील चौदा ते सोळा तास सुरू असते. आता हे केंद्र पुन्हा सुरू करायचे झाल्यास शासनाला जाग आणावी लागेल. त्यासाठी ज्येष्ठ फुटबॉलपटूंसह आम्हीही प्रशिक्षक मंडळी रस्त्यावर उतरण्यास तयार आहोत. उपोषण, आंदोलन आणि संघर्ष कोल्हापूरकरांच्या पाचवीला पूजला आहे. त्यानंतरच आम्हाला केंद्र मिळेल. क्रीडा प्रबोधिनीसह विभागीय क्रीडासंकुलही आंदोलनाद्वारेच पूर्ण होऊ शकते. त्यामुळे संघर्षाशिवाय पर्याय नाही.
07403
- दिग्विजय मळगे, फुटबॉल प्रशिक्षक
----------------
खेळ वाढला; पण सुविधांचे काय ?
दरवर्षी के.एस.ए.च्या माध्यमातून किमान सहा स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर पार पडतात. वैयक्तिक बक्षिसांसह खेळाडूंनाही चांगली बक्षिसे मिळू लागली आहेत. पण हे सर्व केवळ इथेच म्हणावे लागेल. कारण आपली पोरं कोल्हापूरची सीमा काय ओलांडून जाईनशी झाली आहेत. अनेक संधी राज्यासह राज्याबाहेर आहेत. दर्जेदार खेळाडू आहेत. पण त्यांना शिस्त नाही. सरावातील सातत्य कसे टिकवून राहायचे, याबद्दलचे शास्त्रोक्त ज्ञान नाही. याशिवाय खेळातूनच करिअर करण्याची संधी असते. याबद्दलही माहिती नाही. केवळ संघातून चांगला खेळ करायचा आणि मिळेल ते बक्षीस घ्यायचे. इतकीच अनेक खेळाडूंची धारणा झाली आहे. त्यामुळे अगदी दहाव्याच वर्षी त्यांना फुटबॉलचे शास्त्रोक्त पद्धतीने दर्जेदार प्रशिक्षण दिले तर ते खेळाडू राज्य आणि देशासाठी खेळतील. अनेकांची राष्ट्रीय संघातही वर्णी लागू शकते. मात्र, त्याला शिस्तीची चौकट आवश्यक आहे. यासाठी कोल्हापुरात पुन्हा क्रीडा प्रबोधिनीचे निवासी फुटबॉल केंद्र होणे आवश्यक बनले आहे. त्यासाठी आम्हा ज्येष्ठ मंडळींनाच पुढाकार घ्यावा लागेल. कोल्हापूरचे खेळाडू संतोष ट्रॉफी, आयलीग, आयएसएल लीगमध्ये खेळावीत. त्यांना केंद्र व राज्य सरकारमध्ये नोकऱ्या मिळाव्यात. यासाठी चांगले खेळाडू तयार होणे गरजेचे आहे. ही गरज या केंद्रातून पूर्ण होऊ शकते.
07402
- विठ्ठल साळोखे, ज्येष्ठ फुटबॉलपटू
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.