07470
नरके, व्यंकटेश्वरा, घोडावत,
संजीवनी संघ आदींची बाजी
शालेय शासकीय टेबल टेनिस स्पर्धा;
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७ ः जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेत डी. सी. नरके विद्यानिकेतन, संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल, व्यंकटेश्वरा इंग्लिश मीडियम स्कूल, संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल यांनी विजेतेपद पटकाविले.
जयसिंगपुरातील गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालयात झालेल्या या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. चौदा वर्षाखालील मुलांमध्ये डी. सी. नरके विद्यानिकेतनने संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल, कुरुंदवाडचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. तर संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, अतिग्रे संघास तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. मुलींमध्ये संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल, कुरुंदवाडने प्रथम क्रमांक पटकाविला.
सतरा वर्षांखालील मुलांमध्ये व्यंकटेश्वरा इंग्लिश मीडियम स्कूल, कबनूरने संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, अतिग्रेचा पराभव करीत विजेतेपद मिळवले. तर डी. सी. नरके विद्यानिकेतनने तिसरा क्रमांक मिळवला. तर मुलींमध्ये व्यंकटेशवरा इंग्लिश मीडियम स्कूलने संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूलचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. श्रीमती गंगाबाई घोडावत कन्या महाविद्यालयाने तिसरा क्रमांक मिळवला. एकोणीस वर्षाखालील मुलांमध्ये संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलने डी. सी. नरके विद्यानिकेतनचा पराभव करीत विजेतेपद, तर संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूलला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तर मुलींमध्ये व्यंकटेश्वरा इंग्लिश मीडियम स्कूलने संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूलचा पराभव करीत विजेतेपद, तर गंगाबाई घोडावत कन्या महाविद्यालयाने तिसरा क्रमांक मिळवला. स्पर्धेसाठी समन्वयक म्हणून क्रीडा अधिकारी मनीषा पाटील यांनी काम पाहिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.