कोल्हापूर

इचल : बदली करण्याची मागणी

CD

07476

समुपदेशक महिलेची
बदली करण्याची मागणी

इचलकरंजी, ता. २७ : खातरजमा करण्यापूर्वी गर्भवतीस एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे सांगत पूर्ण कुटुंबाची चाचणी करण्यासाठी भाग पडणाऱ्या समुपदेशक महिलेची बदली करावी, या मागणीचे निवेदन माजी नगरसेवक मनोज साळुंखे यांनी आयजीएम रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकुमार बनगे यांना दिले. याप्रकरणी कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही साळुंखे यांनी दिला.
शहरातील गर्भवती नियमित तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात गेली होती. येथे रक्त तपाणीसाठी तिच्यासह अन्य महिलांचे नमुने घेतले. संबंधित महिलेचा तपासणी अहवाल २२ ऑगस्टला आला. यावेळी समुपदेशक महिलेने खातरजमा न करता तुम्ही एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले व तुझ्या कुटुंबाची रक्ततपासणी केली पाहिजे, असे सांगितले. यामुळे गर्भवती महिलेची मानसिकता ढासळल्याने ती आजारी पडली. तिचा पतीही या विचाराने आत्महत्या करण्याच्या मार्गावर होता. दरम्यान नातेवाईकांच्या सल्ल्याने त्यांनी खासगी रुग्णालयात तपासणी केली असता एचआयव्ही नसल्याचा अहवाल मिळाला. त्यानंतर पुन्हा आयजीएम रुग्णालयात तपासणी केल्यावर एचआयव्ही नसल्याचे समजले. समुपदेशक महिलेच्या बेजबाबदारपणाने संपूर्ण कुटुंब उद्‌ध्वस्त होण्याच्या मार्गावर होते. त्यामुळे संबंधित समुपदेशक महिलेवर कारवाई करावी, असे निवेदनात नमूद केले आहे. यावेळी सतीश भस्मे, विद्या सुतार, आण्णा आवळे, संभाजी शिंगारे, मनोज कांबळे, दानंजय दाहोत्रे, शाहनवाज मुजावर संदीप गवड, पंकज तिप्पे, जुनेद मोमीन, महादेव सातपुते उपस्थित होते.
-----------------
कोट :
संबधित समुपदेशकतेच्या बदलीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला आहे.
- डॉ. नंदकुमार बनगे, वैद्यकीय अधीक्षक, आयजीएम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Heatwave: पुणे परिसरात उष्णतेचा तडाखा; लोहगावचा पारा ४२ अंशांवर, तापमान आणखी वाढणार, अंगाची लाहीलाही..

मृण्मयी देशपांडेचं चालतं फिरतं घर पाहिलत का? आता महिनाभर तिथेच राहणार, Viral Video

Kolhapur Gokul Politics : पंधरा दिवसांपूर्वी रुजू झालेले सहायक दुग्ध निबंधक कदम यांची तडकाफडकी बदली, गोकुळचे राजकारण तापलं; मुश्रीफांना अप्रत्यक्ष दणका

Latest Marathi News Live Update: राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

IPL 2026: कोलकता संघाला पहिल्या विजयाची प्रतीक्षा; गुजरातशी आज अहमदाबादमध्ये लढणार, रहाणेच्या नेतृत्वाचा कस, कशी असेल Playing XI

SCROLL FOR NEXT