फोटो 07463
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार
सागर बगाडे यांना जाहीर
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७ : केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने यावर्षी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी देशभरातील ५० शिक्षकांची निवड केली. त्यात कोल्हापुरातील सागर बगाडे यांचा समावेश आहे. रोख ५० हजार रुपये, रौप्यपदक, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. नवी दिल्लीमधील विज्ञान भवन येथे पाच सप्टेंबरला या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
बगाडे हे एस. एम. लोहिया हायस्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये कला शिक्षकपदी कार्यरत आहेत. सार्थक क्रिएशन्स या संस्थेतर्फे ते सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबवितात. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयातील शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाकडून दरवर्षी पाच सप्टेंबर या शिक्षक दिनी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांनी विविध शिक्षकांना सन्मानित केले जाते. यावर्षी या पुरस्काराने देशभरातील एकूण ५० शिक्षकांना गौरविण्यात येणार आहे. त्यात महाराष्ट्रातील बगाडे आणि गडचिरोलीमधील मंतैय्या बेडके यांचा समावेश आहे.
कोट
संस्थेचे पाठबळ आणि प्रत्येक उपक्रमातील विद्यार्थ्यांच्या सक्रीय सहभागामुळे अनेक गोष्टी करू शकलो. आजवर केलेल्या कामाची शासनाने दखल घेतली आणि दहीहंडी सोहळ्यात नटराजाची सेवा करत असतानाच सहकारी मित्रांकडून पुरस्कार मिळाल्याची बातमी मिळाली, हा एक योगायोगच आहे.
- सागर बगाडे, कलाशिक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.