०७४९४
...
अत्याचार करणाऱ्यांवर
कठोर कारवाई करा
आजी-माजी सैनिक संघटनेची मागणी
कोल्हापूर, ता. २७ ः पश्चिम बंगाल येथील डॉक्टर महिलेवरील सामूहिक अत्याचार व हत्येची घटना ताजी असतानाच बदलापूर येथील एका चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराने देश हादरला आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हा आजी-माजी सैनिक संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनेही झाली.
‘विद्यमान सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना अमलात आली खरी मात्र रस्त्यावर आपली बहीणच सुरक्षित आहे का? या सर्व सामान्यांच्या प्रश्नाला आज उत्तर नाही. तिला सुरक्षिततेच्या दृष्टीने मूलभूत व शाश्वत उपाययोजना करण्यास केंद्र व राज्य सरकारला अपयश येत आहे,’ अशा भावना यावेळी निवृत्त कॅप्टन उत्तम पाटील यांनी व्यक्त केल्या. यावेळी जिल्ह्यातील आजी-माजी सैनिक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.