07514
पाचशे रु. विलंब शुल्क
रद्द करण्याची मागणी
शारीरिक शिक्षण शिक्षक संघाचे निवेदन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७ ः शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागासाठी प्राथमिक नोंदणी शुल्क ५० रुपये असताना अन्यायी पाचशे रुपये विलंबित शुल्क आकारले जात आहे. ते रद्द करावे. यासह अन्य मागण्यांकरीता आज शारीरिक शिक्षण शिक्षक संघाने क्रीडा उपसंचालक माणिक पाटील यांची भेट घेत निवेदन दिले.
राज्य शासनाने वैयक्तिक क्रीडा स्पर्धांसाठी २५ रुपये, तर सांघिक क्रीडा प्रकारासाठी ५० रु. शुल्क निश्चित केले आहे. अशा स्पर्धांसाठी शासनाने विशेष निधीची तरतूद केली आहे. तरीही जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पाचशे रुपये अन्यायी शुल्क आकारत आहे. ते रद्द करावे. क्रीडा कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी क्रीडा शिक्षकांना अपमानास्पद वागणूक देत आहेत. गतवर्षी झालेल्या स्पर्धांचे प्रमाणपत्र अद्यापही विद्यार्थ्यांना मिळालेली नाहीत. ते त्वरित द्यावे. जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून शहर व तालुकास्तरावर स्पर्धा कार्यक्रम जाहीर केलेला नाही. तो त्वरित करावा. ऑनलाईन प्रवेशिका भरताना सर्व्हर डाऊन असतो. त्यामुळे प्रवेशिका भरताना अडचणी येतात. पूरस्थितीमुळे अकरावीचे प्रवेशही वेळाने झाले. प्रवेशिका भरताना शाळांच्या लिपिकांकडून चुका होत आहेत. त्यामुळे दुरूस्तीसाठीही शुल्क आकारले जात आहे. हे जाचक प्रकार थांबवावेत, असे निवेदन क्रीडा उपसंचालक माणिक वाघमारे यांना दिले आहे. यावेळी अध्यक्ष आर. डी. पाटील, कार्याध्यक्ष आर. सी. बुवा, सयाजी पाटील, चंद्रशेखर शहा, दत्तात्रय घुगरे, प्रकुल मांगोरे पाटील, महेश सूर्यवंशी, सोपान कदम, रामचंद्र हालके, संताजी भोसले उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.