कोल्हापूर

सरकारने महाराष्ट्राची माफी मागावी

CD

फोटो ०७४३५

सरकारने महाराष्ट्राची माफी मागावी
सतेज पाटील ः मालवणमधील राजकोट किल्ल्याला भेट

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २७ ः राजकोट किल्ला येथील शिवाजी महाराजांचा पुतळा बनविणाऱ्यांना नौदलापर्यंत कोणी पोहोचवले, याचा खुलासा होणे गरजेचे आहे. शासनाने स्वतःचे पाप लपवण्यासाठी दुसऱ्यावर खापर फोडण्याचे काम केले आहे. या उलट शासनाने झालेली चूक मान्य करणे गरजेचे आहे. या सगळ्याला विद्यमान महायुतीचे शासन जबाबदार असून, त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. किंबहुना सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, असे मत काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी येथे व्यक्त केले.
राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी आमदार पाटील यांनी भेट दिली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, साईनाथ चव्हाण उपस्थित होते.
आमदार पाटील म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या दृष्टीने घडलेली ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. ही घटना घडल्यानंतर राज्यभरातून, देशभरातून शिवप्रेमींचा प्रचंड संताप उमटला आहे. फादर ऑफ नेव्ही म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखले जाते. पण, आज त्यांच्या पुतळ्याची अवस्था बघितल्यानंतर प्रचंड दुःख आहे, संताप आहे, राग आहे. योग्य खबरदारी घेतली नाही हे सर्व प्रक्रिया पाहिल्यानंतर लक्षात येते. देशात नौदलाला एक वेगळा इतिहास आहे. आयएनएस विक्रांतसारख्या बोटी बनवण्याची ख्याती असलेले नौदल आहे. या नौदल विभागावर याचे खापर फोडणे म्हणजे नौदलाचा अपमान केल्यासारखे आहे.’’

चौकट
सर्व नियम पाळून पुतळा उभारावा
काँग्रेस म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सर्व नियमांचे पालन करून पुन्हा उभारावा, अशी आमची मागणी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा असेल की हा पूर्णाकृती पुतळा हा महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच व्हावा. त्यामुळे भविष्यकाळातील जबाबदारी महाविकास आघाडी म्हणून आमच्यावर असेल. छत्रपती शिवरायांचा पुतळा समुद्रालाही सामोरा जाईल, अशा पद्धतीचा पुतळा उभारला जाईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT