कोल्हापूर

अनुराधा तेंडूलकर निधन

CD

०८०३१

सामाजिक कार्यकर्त्या
अनुराधा तेंडुलकर यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० ः येथील सारस्वत विकास मंडळाच्या माजी अध्यक्षा, लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा अनिल तेंडुलकर (वय ६९) यांचे आज सकाळी निधन झाले. अवयवदान चळवळीतील एक खंद्या कार्यकर्त्या, अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या मागे दोन मुली, जावई, दीर असा परिवार आहे. त्यांच्या इच्छेनुसार कुटुंबीयांनी देहदान केले.
संस्कृत विषयातून पदवी घेतलेल्या अनुराधाताईंनी पत्रकारितेचेही शिक्षण घेतले होते. पती अनिल तेंडुलकर यांचे निधन झाल्यानंतर त्यांनी केदार स्प्रिंग्ज कारखान्याची जबाबदारी दहा वर्षे सांभाळली. सारस्वत विकास मंडळ, फेमिना क्लब, संयुक्त शारदोत्सव, डॉ. अहिल्याबाई दाभोलकर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्या कार्यरत होत्या. प्रि. दाभोलकर ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी गरजू रुग्णांना उपचार, मार्गदर्शन, आर्थिक सहकार्याबरोबरच विविध ठिकाणी मोफत आरोग्य मेळावेही घेतले. आंतरजातीय विवाहाच्या प्रसारासाठी त्यांनी सोयरिक वधू-वर सूचक मंडळाच्या माध्यमातून पंचवीसहून अधिक वर्षे काम केले. पती अनिल तेंडुलकर यांच्या स्मृती चिरंतन जपण्यासाठी त्यांनी २०१६ मध्ये फौंडेशनची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी अवयवदान प्रचार व प्रसारासाठी विविध कार्यक्रम घेतले. नऊ वर्षांपूर्वी त्यांना कर्करोगाचे निदान झाले. त्यांनी त्यावरही मोठ्या आत्मविश्वासाने मात केली. गेल्या काही दिवसांपासून त्यांना पुन्हा त्रास सुरू झाला. बुधवारी अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्या स्वतः खासगी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, उद्या (शनिवारी) सकाळी दहा वाजता सारस्वत भवन (दसरा चौक) येथे तेंडुलकर परिवार, सारस्वत बोर्डिंग, सारस्वत विकास मंडळातर्फे आदरांजली सभा होणार आहे.

‘सकाळ''साठी विविधांगी लेखन
‘सकाळ'' आणि अनुराधाताईंचे पहिल्यापासून जिव्हाळ्याचे संबंध राहिले. ‘सकाळ''साठी त्यांनी विविधांगी लेखन केलेच. त्याशिवाय गरजूंना मदतीसाठी चार ओळीची बातमी जरी ‘सकाळ''ने प्रसिद्ध केली तर तत्काळ त्यांच्याकडून संबंधित गरजूंना मदत दिली जायची. सध्या त्या प्रत्येक रविवारी ‘उद्यमशीलतेचा वारसा’ या साप्ताहिक सदराच्या माध्यमातून ‘सकाळ''च्या वाचकांशी संवाद साधायच्या. त्या, या सदराच्या माध्यमातून अनेक उद्योजकांच्या यशोकथा उलगडत होत्या; पण, हेच सदर त्यांचे अखेरचे लिखाण ठरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-New Zealand FTA: 20 ऑक्टोबरपासून दारू होणार स्वस्त! भारत-न्यूझीलंड FTA मुळे तुम्हाला काय फायदा?

Tempo Bike Accident : भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने दोन मोटारसायकलला पाठीमागुन उडविल्याने एक जणाचा मृत्यू; तर एकजण जखमी

Marathi News Live Updates: अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमात दोनशेहून अधिक महिलांचा सहभाग

Pitru Paksha 2026: यंदा पितृ पंधरवडा कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या महत्त्वाच्या तिथी

Marathwada Drought : पावसाने पाठ फिरवली; शेतकरी हवालदिल;सोयाबीनला पाणी देण्याची धडपडही निष्फळ; आर्थिक संकट गडद

SCROLL FOR NEXT