कोल्हापूर

शिवाजी चौकातील महागणपतीचे आज आगमन

CD

फोटो- 08215

महागणपतीचे आज आगमन
२१ किलो चांदीची मूर्ती आकर्षण ठरणार

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० : महागणपती प्रसिद्ध असलेले शिवाजी चौक तरुण मंडळाच्या मानाच्या २१ फुटी गणेशमूर्तीचे आज शनिवारी दुपारी तीन वाजता बिंदू चौक येथून आगमन होणार आहे. याच सोहळ्यात २१ किलो चांदीपासून बनविलेल्या महागणपती प्रतिकृतीचेही मिरवणुकीद्वारे आगमन होणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रसाद वळूंजू यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मंडळाचा यंदा ४४ वा गणेशोत्सव आहे. मार्केट यार्ड येथे तयार केलेल्या महागणपती २१ फुटी मूर्ती वाजत-गाजत छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मंडपात आणली जाणार आहे. महागणपतीसोबतच भक्तांनी अर्पण केलेल्या २१ किलो चांदीपासून बनवलेली व सोन्याचा मुलामा दिलेल्या दागिन्यांपासून सजलेली २१ लाख रुपये किमतीची महागणपतीची मूर्ती सर्व भक्तांचे आकर्षण ठरणार आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या संकष्टीला काही भक्तांनी ही २१ किलो वजनाची चांदी मूर्ती मंडळाला अर्पण केली. ही मूर्ती धनवडे गल्लीतील मूर्ती कारागीर सुशील आळतेकर यांनी हुबेहूब महागणपतीची छोटी मूर्ती साकारली आहे. यंदाच्या गणेशोत्सवात ही मूर्ती दर्शनासाठी मंडपात ठेवली जाणार आहे. चांदीच्‍या गणेशमूर्तीचे आगमन दोनशे महिलांच्या उपस्थितीत कोकण पद्धतीने महिलांच्या डोक्यावरून आणून केले जाणार आहे. दसरा चौकातून वारकरी विद्यापीठ, खुपिरे यांचा वारकरी सांप्रदायिक दिंडी सोहळाही होणार आहे. आम्ही कोल्हापूरकर झांज पथकाच्‍या वादनामध्ये शिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे. बिंदू चौक ते छत्रपती शिवाजी महारात चौकापर्यंत पायघड्या घालून पारंपरिक पद्धतीने विराजमान होणार आहे. ही मिरवणूक पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात होणार आहे. जयवंत वळंजू, नितीन पाटील, गणेश वळंजू, प्रताप जाधव, सागर पोवार उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

E20मुळे गाड्या खराब होत नाहीत, ऑक्टोबरमध्ये 100 टक्के इथेनॉलवर चालणारी कार येणार : केंद्रीय मंत्री गडकरी

Mumbai News: रेल्वे पोलिसांच्या कोठडीत ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू, शौचालयात गेला अन्...; CSMTवर काय घडलं?

जमुईतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारावर मंत्री श्रेयसी सिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य; विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल

Marathi News Live Updates: पाण्याची टाकी पाडताना जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू

Lung Health: तुमचं वय वाढतंय अन् फुफ्फुसे वेगाने थकतात! वयानुसार 'लंग हेल्थ' कडे दुर्लक्ष नका करू; वाचा काय सांगतात तज्ज्ञ...

SCROLL FOR NEXT