कोल्हापूर

आदित्य, सम्विद, विवान यांच्यासह ३२ जण आघाडीवर

CD

08227
कोल्हापूर ः करवीर मंगलधाम येथे शुक्रवारपासून ११ वर्षांखालील निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धा व आंतरराष्ट्रीय गुणांकन स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेचे उद्‍घाटन जिल्हा क्रीडाधिकारी नीलिमा अडसूळ व कमलाकांत कुलकर्णी यांनी पटावर चाल करून केले. यावेळी संतोष कोडोलीकर, ॲड. राजेंद्र किंकर आदी मान्यवर उपस्थित होते.
...........
आदित्य, स्मविद, विवान
यांच्यासह ३२ जण आघाडीवर

- अकरा वर्षांखालील बुद्धिबळ निवड चाचणी व आंतरराष्ट्रीय गुणांकन स्पर्धेस सुरुवात

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० ः ॲड. पी. आर. मुंडरगी स्मृती ११ वर्षांखालील निवड चाचणी व आंतरराष्ट्रीय गुणांकन स्पर्धेत आज पहिल्या दिवशी आदित्य जोशी (पुणे), गौरांग भंडारी, स्मविद पासबोला (दोघेही मुंबई), विवान सोनी (कोल्हापूर) यांच्यासह ३२ जणांनी दोन गुणांसह आघाडी घेतली.
करवीर मंगलधाम येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत राज्यभरातून १९९ खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. त्यापैकी ७० बुद्धिबळपटू आंतरराष्ट्रीय गुणांकनप्राप्त आहेत. स्पर्धेत दुसऱ्या फेरीत आदित्य, गौरांग, स्मविद, विवान यांच्यासह निर्वाण शहा (मुंबई), अनय पिंपरकर (नागपूर), कुशाग्र पलिवाल (नागपूर) यांच्यासह ३२ जण आघाडीवर आहेत. मुलींमध्ये दुसऱ्या फेरीअखेर आद्या पाटील (मुंबई), सान्वी गोरे (सोलापूर), बैजू व्याघा (रायगड), भूमिका वाघळे (छत्रपती संभाजीनगर), हिरमई कुलकर्णी (मुंबई) हिच्यासह ११ जणी दोन गुणांसह आघाडीवर आहेत.
स्पर्धेचे उद्‍घाटन जिल्हा क्रीडाधिकारी नीलिमा अडसूळ व कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी यांनी पटावर चाल करून केले. यावेळी करवीर मंगलधामचे संतोष कोडोलीकर, मनीष मारुलकर, ॲड. राजेंद्र किंकर, धीरज वैद्य, प्रा. अरुण मराठे, भरत चौगुले आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Rain Forecast : विदर्भात पावसाचा जोर वाढणार ; चक्रीवादळाचा प्रभाव, २४ सप्टेंबरनंतर मुसळधारेची शक्यता

FDA Action: 'सुलेमान मिठाईवाला'वर बडगा! मुंबईतील १० आस्थापनांचे परवाने एफडीएकडून निलंबित

Asian Games 2026 : भारतीय नौकानयनपटू 'संपावर' जाण्याच्या तयारीत! जपानमध्ये खेळाडूंकडून बंडाची भूमिका; नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : गंगाखेड तालुक्यात गांजाची लागवड, ७६.९६ लाखांचा माल जप्त

Koyna Dam Water Release : कोयना धरणातून 3983 क्युसेक विसर्ग; कृष्णा नदीची पातळी वाढणार, आज सायंकाळपर्यंत पाणी पोहोचणार सांगलीत

SCROLL FOR NEXT