कोल्हापूर

पोलिसवृत्त

CD

टेंपोच्या धडकेत
दोघेजण जखमी

कोल्हापूर, ःगडमुडशिंगी (ता. करवीर) येथे टेंपोच्या धडकेत मोटारसायकलवरील दोघे जखमी झाले. विजय बाबू पवार (वय ४४) व विजय शंकर पवार (४०, दोघे रा. शांतिनगर, पाचगाव) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. याची नोंद गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात झाली.
.................
11963

तलवारीने दहशत करणाऱ्यास बेड्या
कोल्हापूर, ता. १५ ः तलवार हातात घेऊन विक्रमनगरमधील मंडळाजवळ दहशत करणाऱ्यास राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. सचिन शिवाजी आगलावे (वय २६, रा. विक्रमनगर) असे त्याचे नाव आहे. शनिवारी रात्री बाराच्या सुमारास तो तलवार घेऊन विक्रमनगर स्वामी समर्थ मंदिर परिसरात जाऊन लोकांना धमकावत होता.
विक्रमनगरातील गणेशोत्सव मंडळासमोर थांबलेल्या मुलींचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करणाऱ्या संशयित सचिन आगलावेला स्थानिकांनी हटकले. यावेळी त्यांना रहिवाशांना शिवीगाळ केली. काही वेळात तलवार घेऊन तो या मंडळाजवळ पोहोचला. शिवीगाळ करीत धमकाविण्याचा प्रकार त्याच्याकडून सुरू होता. मंडळाच्या स्टेजवर उभारून तो अनेकांना तलवार दाखवत असल्याचे एका व्‍हिडिओमध्ये दिसल्याने राजारामपुरी पोलिसांनी त्याला अटक केली.
..................
11960

तीन वर्षांपासून पसार
खुनातील आरोपीला अटक

कोल्हापूर, ता. १५ ः इस्लामपूर पोलिस ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा लागलेला आरोपी अरुण मारुती घेवदे (सध्या रा. कबनूर, हातकणंगले, मूळ रा. आवंढी, शिराळा) पॅरोल रजेवर सुटल्यानंतर मागील तीन वर्षांपासून पसार झाला होता. कोरोना काळात कळंबा कारागृहातून २ जून २०२१ रोजी पॅरोल रजेवर आला होता. यानंतर तो २८ मे २०२२ रोजी परत जाणे अपेक्षित असताना परतलाच नव्हता. वारंवार पत्रव्यवहार करूनही त्याच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तो वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी येथे आल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्याला सापळा रचून पकडले.
.......................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke: ‘कॉक्रोच’ शब्दावरून मोठा खुलासा; अभिजीत दीपके यांचा दावा, तर CJI सूर्यकांत यांच्याबाबत सौरभ दास काय म्हणाले?

Marathi News Live Updates : पुणेकरांसाठी खुशखबर! म्हाडाच्या ४,४६२ घरांची सोडत जाहीर; १३ लाखांपासून घरांच्या किंमती

Vaibhav Sooryavanshi : वैभवने दुलीप ट्रॉफीच्या सामन्यात 'हे' काय केलं? फोटो व्हायरल होताच सुरू झालीय उलटसुलट चर्चा

अशी सासू सर्वांना मिळो! मृणाल कुलकर्णी शिवानीबद्दल म्हणाल्या…'मला अजिबात तिची सासू वगैरे...'

Ratnagiri Airport Update : रत्नागिरी विमानतळावरून लवकरच उड्डाण! 90 टक्के काम पूर्ण; पाहा कसे असणार अत्याधुनिक टर्मिनल? पालकमंत्री उदय सामंतांकडून पाहणी

SCROLL FOR NEXT