लोगो- 16015
‘सकाळ’च्या ‘प्रॉपर्टी एक्स्पो’ला उद्यापासून प्रारंभ
महासैनिक दरबार हॉलमध्ये वास्तू प्रदर्शन, एकाच छताखाली अनेक पर्याय उपलब्ध
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः स्वप्नातील घराचे तोरण आता ‘सकाळ’च्या ‘वास्तू प्रॉपर्टी एक्स्पो २०२४’मध्ये बांधायची संधी उपलब्ध झाली आहे. मेट्रो लाईफ सिटी प्रस्तुत या प्रदर्शनात जिल्ह्यातील नामवंत बांधकाम व्यावसायिकांनी सहभाग नोंदविला आहे. सर्किटहाऊस रोडवरील महासैनिक दरबार हॉलमध्ये शनिवारपासून (ता. ५) प्रदर्शनाला प्रारंभ होणार आहे. सोमवारपर्यंत (ता. ७) सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत हे प्रदर्शन सुरू राहील.
दरम्यान, या प्रदर्शनाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शहरातील गृह प्रकल्पांची माहिती येथे एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. प्रवेश व पार्किंग मोफत असून, या एक्स्पोसाठी अविष्कार इन्फ्रा हे सहप्रायोजक आहेत.
मला घर घ्यायचे आहे; पण कोठे, किती दर असतील, सुविधा कोणकोणत्या मिळतील, बजेटमध्ये फ्लॅट मिळेल काय, अशा शंकांचे निरसन आता या तीन दिवसांतच होणार आहे. यासाठी ‘सकाळ’च्या ‘वास्तू प्रॉपर्टी एक्स्पो २०२४’ला नक्की भेट द्यावी लागणार आहे. कारण, तुमच्या सर्व शंकांचे निरसन या प्रदर्शनात होणार आहे. शहरातील विविध भागांतील वेगवेगळ्या गृहप्रकल्पांच्या माहितीसह अनेक सवलतींचा वर्षावही येथे होईल. प्रदर्शनात बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्सकडून सूटही मिळणार आहे. प्रदर्शनात सुमारे १७ लाखांपासून ते चार कोटींपर्यंतची घरे पाहायला मिळतील. त्यांच्यातील सुविधांसह अत्याधुनिक बांधकामाचा दर्जाही येथे प्रत्यक्षात बिल्डर्सकडून जाणून घेता येणार आहे. प्रदर्शनात वन, टू, थ्री व फोर बीएचके फ्लॅटसह ड्युप्लेक्स फ्लॅट, पेंट हाऊसेस, रो बंगलो, प्लॉटस्, कमर्शियल गाळे यांची भव्य रेंज असणार आहे. शहरासह उपनगरांतील आणि गावठाणातील गृह प्रकल्पांचीही माहिती प्रदर्शनात मिळणार आहे.
चौकट
अधिक माहितीसाठी संपर्क
लक्ष्मीकांत औंधकर : ९५२७९७२५००
सूरज जमादार : ९५५२५८१९१८
-----
चौकट
या परिसरातील घरे आहेत प्रदर्शनात
निसर्गरम्य प्रतिभानगर, रंकाळा, नागाळा पार्क, ताराबाई पार्क, रुईकर कॉलनी, हरिओमनगर, फुलेवाडी, उजळाईवाडी, राजारामपुरी, निर्माण चौक हॉकी स्टेडियम, गिरगाव, पाचगाव, देवकर पाणंद, शास्त्रीनगर, न्यू पॅलेस रोड, कळंबा, संभाजीनगर, आंबा (ता. शाहूवाडी), कारंडे मळा, फुलेवाडी रिंग रोड, रुक्मिणीनगर व टाकाळा अशा शहराच्या चारही बाजूंचे प्रकल्प तसेच जयसिंगपूर व हातकणंगले येथील प्रकल्प ‘सकाळ’च्या वास्तू प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ मध्ये पाहण्याची संधी मिळणार आहे.
.........
सहभागी संस्था
मेट्रो लाईफ सिटी, आविष्कार इन्फ्रा, रेसन्स कन्स्ट्रक्शन, श्री श्री बिल्डर्स ॲंड डेव्हलपर्स, साई डेव्हलपर्स ॲंड बिल्डर, देशपांडे इन्फ्रा, रिषभ बिल्डर्स, गुरुप्रसाद डेव्हलपर्स ॲंड बिल्डर्स, दत्त साई बिल्डर्स ॲंड डेव्हलपर्स, महाभारत कन्स्ट्रक्शन, बेडेकर लाईफ्सस्पेसेस एलएलपी, लोखंडे बिल्डर्स, सिद्धिविनायक रिअलटर्स, श्री सिद्धी बिल्डर्स ॲंड डेव्हलपर्स १, सूर्यवंशी पाटील बिल्डर्स ॲंड डेव्हलपर्स, बटू बिल्डर्स, रामसिन्हा ग्रुप, सूरज इस्टेट डेव्हलपर्स, श्री मधुपुरी कन्स्ट्रक्शन्स, पद्मप्रिया बिल्डर्स ॲंड डेव्हलपर्स, विश्वकर्मा गृहनिर्माण प्रायव्हेट लिमिटेड, गायकवाड इन्फ्रास्ट्रक्चर, साळोखे बिल्डर्स, आयडियल कन्स्ट्रक्शन्स.
..........
कोट
शहराबरोबरच उपनगरासह शहराच्या हद्दीवरील गावात आता मोठे गृहप्रकल्प साकारले जात आहेत. हे सर्व प्रकल्प एकाच ठिकाणी ग्राहकांना पाहाता येणार आहेत. प्रदर्शनाला नक्कीच मोठा प्रतिसाद मिळेल.
- ललित गांधी, अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स
कोट
दसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर होणारे हे प्रदर्शन सर्वांसाठीच उपयुक्त ठरणार आहे. अनेकांना स्वप्नातील घराची संकल्पपूर्ती करण्याची संधी यानिमित्ताने एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे.
- अविनाश जाधव, चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक, आविष्कार इन्फ्रा
कोट
‘सकाळ’च्या प्रदर्शनामुळे ग्राहकांना एकाच ठिकाणी घरखरेदीसाठी अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत. त्याशिवाय बांधकाम व्यावसायिकांनाही अधिकाधिक ग्राहकापर्यंत पोहोचण्याची ही एक संधी आहे.
- के. पी. खोत, अध्यक्ष, क्रिडाई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.