प्रवचन मालिकेला
दुंडगेमध्ये प्रारंभ
गडहिंग्लज, ता. ४ ः दुंडगे (ता. गडहिंग्लज) येथे नवरात्रोत्सव समितीच्या वतीने नवरात्रनिमित्त प्रवचन मालिकेला प्रारंभ झाला. कमत्यानहट्टी (ता. चिक्कोडी) येथील सिद्धसंस्थान मठाचे मठाधिपती प.पू. श्री. गुरूदेव देवरू यांच्या हस्ते मालिकेचे उद्घाटन झाले. प्रवचन मालिकेचे हे २४ वे वर्ष आहे.
निडसोशीचे श्री शिवलिंगेश्वर महास्वामींच्या मार्गदर्शनाने दरवर्षी नवरात्रोत्सवात हा उपक्रम घेतला जातो. दरम्यान, श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर मूर्तीची विधीपूर्वक प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी स्वामीजी म्हणाले, सर्व आजार बरे होण्यासाठी डॉक्टर असतात. पण मनुष्याचे मन स्वच्छ करण्यासाठी प्रवचने महत्वाचे आहेत. वर्षातून एकवेळ का होईना प्रवचनाच्या माध्यमातून संतसंग करून देवीचे नामस्मरण केल्यास मनाला शांती मिळते.’
उदयकुमार देसाई यांनी स्वागत केले. गोविंद कोरी यांनी आभार मानले. यावेळी महाबळेश्वर चौगुले, चिनगोंडा, बी. जी. मोकाशी, अॅड. संजय देसाई, प्रकाश हरगापुरे, विलास सोलापुरे, सुभाष संकेश्वरी, शोभा पाटील, लक्ष्मी पाटील व भजनी मंडळे उपस्थित होते. मान्यवरांचा सत्कार झाला. मंगळवारी (ता. ८) हनुमान मंदिरात येथे ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.