सांगावला होमिओपॅथी, आयुर्वेद महाविद्यालय
कोल्हापूर ,ता. ४ ः येथील मौजे सांगाव (ता. कागल) येथे नवीन शासकीय होमिओपॅथी आणि रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या आज बैठकीत झाला. चार एकर जागेत १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे होमिओपॅथी महाविद्यालय व ५० खाटांचे रुग्णालय होईल. त्यासाठी २४८ कोटी ९० लाख रुपये इतक्या खर्चास मान्यता मिळाली. कोल्हापुरात शासकीय होमिअपॅथी महाविद्यालय सुरू व्हावे यासाठी दै. ‘सकाळ’मधून वृत्त प्रसिध्द केले होते.
होमिओपॅथी महाविद्यालयासाठी २४८.९० कोटी खर्चास मान्यता आहे. तसेच १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व ५० रुग्ण खाटांचे आयुर्वेद रुग्णालयास मंजुरी मिळाली. त्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पाठपुरावा केला होता.
उत्तूरला वैद्यकीय तांत्रिक प्रशिक्षण केंद्र
उत्तुर (ता. आजरा) येथे १०० प्रशिक्षणार्थी क्षमतेचे राज्यस्तरीय वैद्यकीय तांत्रिक प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली. या तांत्रिक प्रशिक्षण केंद्रासाठी एकूण रुपये २५२.०३५ कोटी खर्चास व आवश्यक पदे भरतीसाठी मंजूरी मिळाली आहे.
महसूल विभागाच्या सहमतीने जिल्हाधिकाऱ्या मार्फत जागा निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.