फोटो 17925
देवल क्लबमध्ये रंगले
‘संगीत जयदेव’ स्वरनाट्य
गोविंदराव टेंबे स्मृतिदिनी सजली अनोखी मैफल
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ ः रसिकाग्रणी गोविंदराव टेंबे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून आज गोविंदराव टेंबे यांनी निर्मिलेल्या ‘गीतगोविंद’कार कवी जयदेव यांच्या जीवनावर आधारित ‘संगीत जयदेव’ हे स्वरनाट्य सादर झाले. देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे रंगमिदारात या स्वरनाट्याचे बैठे सादरीकरण झाले. दरम्यान, ‘जयदेव’ हे नाटक धर्मसत्तेसमोर हतबल झालेल्या राजसत्तेवर भाष्य करणारे नाटक आहे. रसिकांचा या स्वरनाट्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
‘जयदेव’ही संगीतिका गोविंदरावांच्या काळात खूप गाजली होती. दीड वर्षापूर्वी हीच संगीतिका तब्बल पन्नास वर्षांनंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललितकला केंद्राच्या विद्यार्थ्यांकडून प्रा. डॉ. केशवचैतन्य कुंटे यांच्यामार्फत वेगळ्या पद्धतीने रसिकांसमोर सादर करण्यात आली. त्यासाठी १९७४ मध्ये या नाटकात भूमिका केलेल्या पं. सुधीर पोटे यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले होते. त्यानंतर येथील रसिकांसाठी सांगीतिक अभिवाचन स्वरूपात सादरीकरण झाले. कार्यक्रमाची प्रस्तुती व सादरीकरण ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी केले.
चौकट
पन्नास वर्षांपूर्वीच्या स्मृतींना उजाळा
‘संगीत जयदेव'' स्वरनाट्यात पन्नास वर्षांपूर्वी काम केलेल्या शशी सडोलीकर, रोजा बारगीर, सीमा मराठे व पं. सुधीर पोटे यांचा यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी अरविंद पिळगावकर यांच्या हस्ते सन्मान झाला. यानिमित्ताने पन्नास वर्षांपूर्वीच्या स्मृतींनाही उजाळा मिळाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.