कोल्हापूर

‘मुद्रांक’च्या २५ सुनावण्या ‘व्हीसी’द्वारे पूर्ण

CD

बिगस्टोरी
-प्रवीण देसाई

‘मुद्रांक’च्या २५ तक्रारी ‘व्हीसी’द्वारे निकाली
सात महिन्यांतील चित्र ः अन्य शासकीय कार्यालयांमध्ये हवी अंमलबजावणी

कोल्हापूर : ‘मुद्रांक’ विभागाशी संबंधित तक्रारींच्या सुनावण्या आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (व्हीसी) होत आहेत. सात महिन्यांत २५ तक्रारी निकाली निघाल्या आहेत. माहिती अधिकार, लोकायुक्त, सर्वसाधारण तक्रारी याचे आदेश ऑनलाईनद्वारे संबंधित खातेदारांच्या मेलवर पाठविले आहेत. त्याचबरोबर इतर सुनावण्यांबाबतचे संदेशही ऑनलाईनद्वारे संबंधित खातेदारांच्या मोबाईलवर मिळत आहेत. मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या उपक्रमामुळे खातेदारांचा वेळ, हेलपाटे आणि पैसेही वाचत आहेत. अशा पद्धतीने अन्य शासकीय कार्यालयांमध्ये ही अंमलबजावणी करण्यास हरकत नाही.
---
मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी थेट ‘व्हीसी’द्वारे सुनावण्या घेण्याचा उपक्रम सुरू केला आहे. ‘मुद्रांक’ विभागाशी संबंधित विविध तक्रारींच्या सुनावणीसाठी खातेदारांचे व तालुक्यातील दुय्यम निबंधकांचे हेलपाटे आता थांबले आहेत. मुद्रांक विभागाची प्रतिमा सुधारण्याबरोबरच सुनावणीसाठी येणाऱ्या खातेदारांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास कमी व्हावा, हा यामागील उद्देश आहे. मुद्रांक विभागाशी संबंधित माहिती अधिकार, सेवाहमी कायदा, मुद्रांक दस्त अशा विविध तक्रारींच्या सुनावणी कोल्हापुरातील जिल्हा मुद्रांक कार्यालयात होतात. या सुनावणीसाठी यापूर्वी तालुक्याच्या मुद्रांक उपनिबंधकांसह संबंधित तक्रारदारांना उपस्थित राहावे लागायचे. या सुनावणीसाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांतील लोकांचे हेलपाटे व्हायचे. तसेच संबंधित अधिकारीही त्यांच्यासोबत येत असल्याने तालुकास्तरावरील कामेही ठप्प व्हायची. यामुळे ‘व्हीसी’द्वारे सुनावणी घ्यायची संकल्पना पुढे आली. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर सुनावण्या झाल्या. त्या यशस्वी झाल्या. त्यानंतर त्यातील काही त्रुटी दूर करून त्याची एप्रिल महिन्यापासून थेट अंमलबजावणी सुरू केली. सुनावणीसह निकाल ही ऑनलाईन मिळत आहे.
................................................
जिरवाजिरवीच्या तक्रारी?
‘मुद्रांक’ जिल्हाधिकाऱ्यांसमोर झालेल्या सुनावणीमध्ये काही तक्रारी या जिरवाजिरवीच्या असल्याची चर्चा आहे. तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांविरोधातील तक्रारी आहेत. हे अधिकारी वेळेत काम करत नाहीत, हेलपाटे मारायला लावतात, चिरीमिरीसाठी कामे थांबवितात, असे तक्रारीचे स्वरूप असल्याचे समजते. या तक्रारींच्या सुनावणीसाठीही संबंधित तक्रारदार गैरहजर राहात असल्याचे चित्र आहे. एकंदरीत संबंधित अधिकाऱ्याची जिरविण्यासाठीच अशा तक्रारी केल्या जात असल्याचे दिसत आहे.
...............................
तासाभरात सुनावणी
महिन्यातील दोन सोमवारी सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत सुनावण्या घेतल्या जातात. यासाठी जिल्हा मुद्रांक कार्यालयातून तालुक्याच्या ठिकाणी ‘व्हीसी’द्वारे लिंक दिली जाते. ती ओपन करून संबंधित अधिकारी व खातेदार सहभागी होतात. ही सुनावणी पूर्ण झाल्यानंतर याबाबतचा निर्णय मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतला जातो. सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम निकालाचा आदेश मेलद्वारे संबंधितांना पाठविला जातो.
...........................
कोट...
‘मुद्रांक’ विभागाशी संबंधित तक्रारींबाबत सुनावणीसाठी तक्रारदार व संबंधित अधिकाऱ्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी यावे लागायचे. यामुळे तक्रारदारांचा वेळ, पैसा खर्च व्हायचा. या सुनावणीसाठी संबंधित अधिकारीही येत होते. त्यामुळे तालुकास्तरावरील अन्य कामे ठप्प व्हायची. त्यामुळे ‘व्हीसी’द्वारे सुनावण्या घेण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या माध्यमातून ऑनलाईनद्वारे सुनावणीची तारीख, प्रकरणाची सद्यस्थिती व निकाल तक्रारदाराला मोबाईल किंवा मेलवर पाठविला जात आहे.
- बाबासाहेब वाघमोडे, मुद्रांक जिल्हाधिकारी
.....................................
दृष्टिक्षेपात उपक्रम
-खातेदारांचे वाचले हेलपाटे अन्‌ पैसे
-घरबसल्या खातेदारांच्या हातात मेलद्वारे निकाल
-अन्य कार्यालयांमध्ये अंमलबजावणीची गरज
-मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुनावणीसाठी उपक्रम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : "...तर सेवेचा राजीनामा द्या अन् संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा"; राज ठाकरेंची IPS विश्वास नांगरे पाटलांवर टीका

Malvan Swimming Pool VIDEO : काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ! स्विमिंग पूलमध्ये उंचावरून मारली उडी, डोकं तळाशी जोरात आपटलं, 25 वर्षीय युवकाचा दुर्दैवी अंत

Latest Marathi News Live Update : विशाळगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात; मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती

Mumbai Water Supply: मुंबईवर कपातीचे संकट! धरणांनी गाठला तळ, अत्यल्प पावसामुळे चिंता

Video Viral: जग पाहता येत नाही... पण बापाच्या शब्दांनी रोनाल्डोचा गोल अनुभवला; लेकाची रिअ‍ॅक्शन डोळे पाणावतील

SCROLL FOR NEXT