जिल्ह्यातील ११६ इच्छुकांनी
घेतले २८४ उमेदवारी अर्ज
विधानसभा निवडणूक; एकही दाखल नाही
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ ः विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. जिल्ह्यातील १० मतदारसंघातून ११६ इच्छुकांनी २८४ अर्ज घेतले आहेत. उमेदवारी अर्ज नि:शुल्क आहेत. बहुतांश उमेदवारी गुरुवारी (ता.२४) अर्ज भरणार असल्याचे सांगण्यात आले. विधानसभा निवडणुकीची घोषणा नुकतीच झाली. त्यानंतर आजपासून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली; मात्र आज एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही.
चौकट
मतदारसंघ* अर्ज विक्री*
कोल्हापूर उत्तर* २६*
कोल्हापूर दक्षिण* ५७*
करवीर* १४*
कागल* २३*
शिरोळ* १८*
हातकणंगले* १६*
राधानगरी* २७*
शाहूवाडी* २३*
इचलकरंजी* ३६*
चंदगड* ४४*
एकूण* - २८४*
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.