29126
गडहिंग्लज ः दिव्यांग दिनानिमित्त शहरातील तिन्ही शाळांच्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी प्रबोधन फेरी काढली.
....
दया नको, हवा मदतीचा हात
गडहिंग्लजला प्रबोधन फेरी ः गडहिंग्लजला दिव्यांग दिनाचा कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३ ः नको दयेची भीक, हवा मदतीचा हात, दिव्यांगांना हसवा-दिव्यांगांना फुलवा, अशा घोषणांचे फलक घेऊन शहर परिसरातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी शहरातून आज प्रबोधन फेरी काढली. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त या फेरीचे आयोजन केले होते.
येथील चैतन्य अपंगमती विकास विद्यालय, निवासी मुकबधीर विद्यालय व साई निवासी मुकबधीर विद्यालयातर्फे या फेरीचे आयोजन केले होते. सकाळी पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांच्याहस्ते फेरीचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी दिव्यांगाचे कायदे व संरक्षणाबाबत मार्गदर्शन केले. शहरातील प्रमुख मार्गावरून फेरी काढण्यात आली. मन हेलावून सोडणाऱ्या घोषणा दिव्यांग मुलांनी दिल्या. दुसऱ्या सत्रात तहसीलदार ऋषिकेत शेळके यांच्याहस्ते हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. शेळके यांनी दिव्यांगासाठी असलेल्या योजनांची माहिती देवून आवश्यक ते सहकार्य करण्याची सदैव तत्पर राहू अशी ग्वाही दिली. साताप्पा कांबळे यांनी स्वागत केले. बाबासाहेब पाटील यांनी दिव्यांगांच्या प्रगतीत येणाऱ्या अडथळ्यांचा आढावा घेतला. रामकुमार सावंत यांचे भाषण झाले. तिन्ही शाळांचे शिक्षक, कर्मचारी, रेखा पोतदार, अरूणा कांबळे, सरीता रजपूत, मेघा मोकाशी, अनिल चव्हाण, संभाजी पोवार आदी उपस्थित होते.
दरम्यान, दिव्यांग दिनानिमित्त विठ्ठल मंदिरात दिव्यांग बांधवांचा मेळावा झाला. शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. रामकुमार सावंत, सिद्धार्थ बन्ने यांनी मार्गदर्शन केले. संदीप नाथबुवा, बंडू गवळी, शिवगोंडा पाटील यांचे सहकार्य मिळाले. मेळाव्याचे नियोजन संजय पोवार, समर्थ जाधव, दुंडाप्पा न्हावी, अशोक संकपाळ, सुरेखा पाटील, शिवाजी गवळी यांनी केले होते.
.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.