कोल्हापूर

पत्रकांचा पट्टा

CD

फुले, डॉ. आंबडेकरांच्या
पुतळ्यांचा वर्धापनदिन
कोल्हापूर : बिंदू चौक येथील क्रांतीबा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या पुतळ्यांच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष सूर्यमणी भिऊगडे, प्रदेशाध्यक्ष सुनीलभाऊ यादव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. भिऊगडे यांनी ७४ वर्षे हा पुतळा देशाला प्रेरणा देत असल्याचे सांगितले. पुढील वर्षी अमृतमहोत्सव साजरा करण्याची संकल्पना सांगितली. अध्यक्ष बाळासाहेब भोसले, दिगंबर लोहार यांनी मनोगत व्यक्त केले. ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त बिंदू चौकात बुंदी लाडूचे वाटप केले. पुणे जिल्हाध्यक्ष शशिकांत थोरात, नागपूर ग्रामीण अध्यक्ष प्रशांत लाखे, संग्राम यादव, तकदीर कांबळे, अनिल कुरणे, प्रा. अजित कोठावळे, बाबासाहेब कांबळे, सुशीलकुमार कोल्हटकर, आर. के. कांबळे, शांतीनाथ कणिरे, धोंडिराम कांबळे, तुकाराम कांबळे, दत्ता पाटील, तानाजी करपे, उदय चव्हाण, पुंडलिक कांबळे, सुनील माळवी, शंकर पाटील, जितेंद्र कांबळे, माधुरी कांबळे, सनातन कांबळे उपस्थित होते.
...

रविदास महाराज पुण्यतिथी
कोल्हापूर : संत रविदास महाराज पुण्यतिथीनिमित्त सुभाषनगर येथील रविदास महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. चर्मकार कल्याण फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक यादव यांनी पुष्पहार अर्पण केला. जिल्हाध्यक्ष गोकुळ कांबळे, सुनील शिंदे, चंद्रकांत यादव, केशव पोवार यांनी विचार व्यक्त केले. श्री. यादव म्हणाले, ‘‘चर्मकार समाजाने संत रविदास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवराय, राजश्री छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले यांचे आचारविचार समाजापर्यंत पोहोचवावे. विचार जोपासावेत.’’ दशरथ गवळी, उत्तम आझाटे, अशोक भंडारे, सुनील शिंदे, काकासाहेब मोरे, मारुती चव्हाण, भारत गायकवाड, अशोक हंकारे, दिव्यकांत यादव, समाज बांधव उपस्थित होते. रामचंद्र बिसूरे यांनी आभार मानले.
...

मातंग समाज वधू-वर,
विधवा-विधूर मेळावा
कोल्हापूर : जिल्हा मातंग कला, क्रीडा व सांस्कृतिक ट्रस्टमार्फत कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगांव जिल्ह्यातील मातंग, ख्रिश्चन समाज, विधवा-विधूर, घटस्फोटित, वधू-वर इच्छुक पालक परिचय मेळावा २२ तारखेला दुपारी दोन ते पाच वेळेत आयोजित केला आहे. हा मेळावा शाहू स्मारक भवन, मिनी हॉल येथे होईल. तरी इच्छुक वधु-वर पालकांनी नोंद घ्यावी. मेळाव्यात इच्छुक वधू-वरांना घेऊन यावे, असे आवाहन अध्यक्ष एस. बी. शेंडगे, उपाध्यक्ष अशोक पाटोळे, खजिनदार रमेश तिळवे, सचिव विलास मंगल यांनी केले आहे.
...

संविधानविरोधी
प्रवृत्तीचा निषेध
कोल्हापूर : परभणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंबेडकरी समाजाने भारतीय संविधानाची प्रतिकृती उभी केली आहे. संविधान विरोधी प्रवृत्तीच्या लोकांनी त्या प्रतिकृतीची मोडतोड केली. याचा महाराष्ट्र बहुजन आघाडीच्या वतीने निषेध केला. आंबेडकरी समाजाने शांततामय आंदोलन करावे, असे आवाहन महाराष्ट्र बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. अनिल माने यांनी केले आहे. बैठकीत प्रकाश हुलस्वार, प्रमोद हुपरीकर, महावीर लाटकर, सुरेश जत्राटकर, राजेंद्र कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.
...

शाहू कॉलेजमध्ये पालक मेळावा उत्साहात
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजधील ज्युनिअर कॉलेजच्या कला, वाणिज्य व विज्ञान विभागाचा पालक मेळावा झाला. प्रभारी प्राचार्य डॉ. डी. आर. भोसले म्हणाले, ‘‘पालकांनी मुलांना वेळ द्यावा. मुलांना जास्त वेळ दिला त्यांच्यावर योग्य वेळी योग्य संस्कार केले तर मुले नक्कीच भविष्यात चमकतील.’’ प्रा. ए. एस. पाटील, प्रा. जे. ए. कांबळे, रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य प्रा. डी. एम. गायकवाड, प्रा. पी. एच. कांबळे, प्रा. स्नेहा पाटील, वर्गशिक्षिका प्रा. एस. एस. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. वाणिज्य विभागाच्या पालक मेळाव्यात पालक प्रतिनिधी म्हणून कृष्णात संकपाळ, शुभांगी शिंदे यांनी तर सायन्स विभागाच्या पालक मेळाव्यात उदय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कोरेगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. डी. कदम म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांना मिळालेले शिक्षक देवासारखे असतात. त्यांची आणि आई-वडिलांची तळमळ लक्षात घेऊन विद्यार्थांनी जीवनात परिवर्तन करावे आणि उंच शिखरावर पोहचावे.’’ ज्युनिअर कॉलेज विभागाच्या उपप्राचार्या एल. बी. चव्हाण यांनी यावर्षी बोर्ड परीक्षा लवकर असल्याने पालकांनी मुलांच्या अभ्यासाकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. पुढील तीन महिने टीव्ही बंद ठेवावेत. मोबाईल मुलांना वापरण्यास देऊ नये.’’
...


संस्कार विद्यामंदिरचे
वार्षिक स्नेहसंमेलन
कोल्हापूर : शिये येथील संस्कार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन झाले. खासगी प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी शाळेच्या उपक्रमांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक मच्छिंद्र नाळे यांनी प्रास्ताविक केले. संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव बुवा यांनी शाळा स्थापनेचा हेतू सफल होत असल्याचे समाधान व्यक्त केले. सरपंच सौ. शितल कदम, समितीचे राज्य सचिव शिवाजीराव भोसले, नीलेश कदम उपस्थित होते. सुरेश पाटील यांनी सूत्रसंचालन तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश वांद्रे यांनी केले. शिवाजी चौगले यांनी आभार मानले. शिक्षक राजेंद्र देशमुख, सायराबानू मोमीन, चैताली चौगले, संजीवनी भारती, खुटाळे यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘आमदार-खासदार-कंत्राटदार’ राजकारण सुरू; महाराष्ट्रात दरवर्षी हजारो मुले बेपत्ता... आकडेवारी देत राज ठाकरेंनी सरकारला घेरलं

Maharashtra Kesari: 'महाराष्ट्र केसरी'चा थरारक कुस्ती सामना! महेंद्र गायकवाड, बाळू बोडकेची विजयी सलामी; जमदाडेचं आव्हान संपुष्टात

Raj Thackeray: महाराष्ट्रावर ११ लाख कोटींचं कर्ज.. इराणबद्दल भूमिका अन् इन्स्टाग्राम रील्स; गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंचं मुद्द्यांवर बोट

गॅस सिलिंडर मिळेना, आता ‘या’ कुटुंबांना मिळणार रॉकेल! ग्रामीण भागासाठी निर्णय, सोलापूर जिल्ह्यात साडेचार लाख व्यक्तींची माहिती पाठविली, वाचा...

Unseasonal Rain : चुंगी परिसरात गारपीट आणि दर या दुहेरी संकटाने कांदा उत्पादक हवालदिल

SCROLL FOR NEXT