कोल्हापूर

भाजप निवेदन बातमी

CD

फोटो-31047

श्री कपिलेश्वर मंदिर
अतिक्रमणमुक्त करा

भाजपची मागणी, प्रशासकांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः शहराचे ग्रामदैवत श्री कपिलेश्वर हे प्राचीन मंदिर असून, तो कोल्हापूरचा सांस्कृतिक, धार्मिक ठेवा आहे. परंतु, या मंदिराभोवती वर्षानुवर्षे टपऱ्या, फळ विक्रेते, भाजी विक्रेते यांनी अतिक्रमण केले आहे. महापालिका प्रशासनास वारंवार सूचना करूनही याकडे लक्ष दिले जात नाही. हे मंदिर त्वरित अतिक्रमणमुक्त करून तेथे स्वच्छता ठेवावी. अन्यथा भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. या मागणीचे निवेदन उपायुक्त साधना पाटील यांना दिले.
जिल्हा उपाध्यक्ष हेमंत आराध्ये म्हणाले, ‘कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री कपिलेश्वर मंदिराची जी दुरवस्था झाली आहे. ती अतिशय दयनीय आहे. तसेच भक्तांना प्रदक्षिणा घालण्यासाठी जो बाहेरील मार्ग आहे तो संपूर्णत: अतिक्रमनाच्या विळख्यात आहे. मंदिराच्या शिखरावर झाडे-झुडपे वाढलेली आहेत. मंदिराच्या भोवती असणारी गटर्स कधीच साफ केली जात नाहीत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने वरील बाबींचा गांभीर्याने विचार करून विषयाशी संबंधित विभागांना सूचना देऊन कडक कारवाई करावी.’
उपायुक्त साधना पाटील म्हणाल्या, ‘दोन दिवसात प्रत्यक्ष कपिलतीर्थ मंडई येथे येऊन मंदिर व परिसर अतिक्रमणमुक्त करू.’ जिल्हा सरचिटणीस गायत्री राऊत, युवा मोर्चा अध्यक्ष गिरीश साळोखे, संग्राम जरग, विजय आगरवाल, प्राची कुलकर्णी, युवराज शिंदे, भारत भोसले, सचिन पोवार, अनिश पोतदार उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘आमदार-खासदार-कंत्राटदार’ राजकारण सुरू; महाराष्ट्रात दरवर्षी हजारो मुले बेपत्ता... आकडेवारी देत राज ठाकरेंनी सरकारला घेरलं

Maharashtra Kesari: 'महाराष्ट्र केसरी'चा थरारक कुस्ती सामना! महेंद्र गायकवाड, बाळू बोडकेची विजयी सलामी; जमदाडेचं आव्हान संपुष्टात

Raj Thackeray: महाराष्ट्रावर ११ लाख कोटींचं कर्ज.. इराणबद्दल भूमिका अन् इन्स्टाग्राम रील्स; गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंचं मुद्द्यांवर बोट

गॅस सिलिंडर मिळेना, आता ‘या’ कुटुंबांना मिळणार रॉकेल! ग्रामीण भागासाठी निर्णय, सोलापूर जिल्ह्यात साडेचार लाख व्यक्तींची माहिती पाठविली, वाचा...

Unseasonal Rain : चुंगी परिसरात गारपीट आणि दर या दुहेरी संकटाने कांदा उत्पादक हवालदिल

SCROLL FOR NEXT