३१५१४
अमेरिकेतील विद्यापीठाचे
कौस्तुभ बंकापुरे यांना अनुदान
कोल्हापूर, ता. १३ ः अमेरिकेतील जॉर्ज मेसन विद्यापीठ मर्केटस सेंटरतर्फे येथील कौस्तुभ बंकापुरे यांना अप्लाईड थिएटर शिक्षणासाठी संशोधन अनुदान मिळाले आहे.
श्री. बंकापुरे अप्लाईड थिएटर इंडिया फाउंडेशनचे संचालक आहेत. नावीन्यपूर्ण डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करण्यासाठी हे अनुदान असून, या अभिनव प्रकल्पाचा उद्देश भारतातील अप्लाईड थिएटर शिक्षणाला अधिक सोपे, उपलब्ध आणि किफायतशीर बनविणे असा आहे. विकसित केला जाणारा हा डिजिटल प्लॅटफॉर्म अप्लाईड थिएटर शिक्षणाला भारतातील दुर्गम भागातील लोकांपर्यंत नेण्यास मदत करेल आणि अशा संधी न मिळालेल्या व्यक्तींनाही या प्रकारच्या शिक्षणाची संधी उपलब्ध करून देईल. २०२० मध्ये कोरोना काळामध्ये श्री. बंकापुरे यांनी फाउंडेशनची स्थापना केली. त्यांना भारत सरकारकडून स्टार्टअप मान्यता मिळाली आहे. या चार वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांनी फाउंडेशनच्या विविध अभ्यासक्रमांच्या माध्यमातून सातशेहून अधिक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे.
..........
३१५१५
सचिन भोसले
यांना पीएच.डी.
कोल्हापूर, ता. १३ ः येथील सचिन भोसले यांना राजस्थान येथील सनराईज विश्व विद्यालयाची स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पीएच.डी. मिळाली. ते कागल नगरपरिषद बांधकाम विभागाकडे शहरस्तरीय तांत्रिक कक्षाकडे अभियंता म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ‘इरिगेशन मॅनेजमेंट सिस्टिम इन कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट रेफरन्स टू इंडियन अर्बन एरिया’ या विषयावर प्रबंध सादर केला होता. त्यांना डॉ. अंबादास लोंढे यांचे मार्गदर्शन मिळाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.