‘फेर मतमोजणीवेळी
इंटरनेटवर्क
सेवा बंद करा’
कोल्हापूर : करवीर तालुका विधानसभा मतदारसंघातील फेरमतमोजणी करताना मतमोजणी केंद्र परिसरातील एक हजार मीटर अंतरावरील सर्व इंटरनेट सेवा बंद ठेवावी, अशी मागणी काँग्रेस सेवादल अध्यक्ष रंगराव देवणे यांनी आज जिल्हा निवडणूक विभागाला निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले आहे, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पाच हजारांपेक्षा कमी मतांनी पराभव झालेल्या उमेदवारासाठी फेरमते मोजणीसाठी सरकारकडे अर्ज केला आहे. महाविकास आघाडीचे करवीरचे उमेदवार राहुल पाटील हे अवघ्या दोनशे मतांनी पराभूत झाले आहेत. त्यामुळे त्यांनी फेरमत मोजणीसाठी सरकारकडे अर्ज केला आहे. फेर मतमोजणी होत असताना सभोवतालची म्हणजेच जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या १००० मीटर अंतरावरील फेर मतदानाची प्रक्रिया होईपर्यंत पूर्णपणे इंटरनेट सेवा बंद करावी. यावेळी संजय पोवार-वाईकर, शोभा पाटील, संदीप कोले, बाजीराव पाटील, संभाजी इंगवले, संजय पाटील उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.