कोल्हापूर

कोल्हापूर-सांगली रस्ता ...निविदा अवंतिका कंस्ट्रक्शन कडे.... प्रक्रिया अंतिम टप्प्यात

CD

लोगो
सांगली-कोल्हापूर
रखडलेला महामार्ग
००००००००००

सांगली फाटा ते अंकली
टप्प्याला अखेर मुहूर्त
‘अवंतिका’ला काम; प्रक्रिया अंतिम टप्प्यात


सकाळ वृत्तसेवा
हातकणंगले, ता. ८ ः कोल्हापूर-सांगली महामार्गातील अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या सांगली फाटा -चोकाक- अंकली रस्त्याच्या कामास अखेर मुहूर्त मिळाला आहे. हा टप्पा ३३ किलोमीटरचा असून, एकूण ११९२. ८४ कोटी निधीतून चौपदरीकरणासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यासाठी एकूण १२ ठेकेदारांनी निविदा सादर केल्या होत्या. त्यापैकी अवंतिका कन्स्ट्रक्शनची निविदा अंतिम मानली जात आहे. त्यांनी ८.१४ टक्के कमी दराने ही निविदा भरली आहे.
या कामांतर्गत हातकणंगले येथे सुमारे १२५० मीटरचा उड्डाण पूल, तर कृष्णा नदीवर ३५० मीटरचा नव्याने पूल बांधण्यात येणार आहे. कोल्हापूर-सांगली रस्त्यासाठी अनेकवेळा आंदोलने झाली. त्यामुळे रस्त्यासाठी २०१२ मध्ये सुप्रिम कंपनीला काम दिले; मात्र कंपनीने हे काम अर्धवट सोडले होते.
मुळात हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यासाठी निधी देऊ शकत नव्हते आणि सार्वजनिक बांधकामकडे एवढ्या निधीची उपलब्धता नव्हती. अखेरीस केंद्रीय वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याचे नुकतेच महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरण केले. हस्तांतरण होताच प्रकल्प अहवाल तयार होऊन ११९२.८४ कोटींचा प्रस्ताव मंजूर झाला.
सुमारे ३३ किलोमीटरच्या रस्त्यासाठी ७५० कोटींचा निधी मंजूर आहे. सुमारे ४४२ कोटींचा निधी इतर सोयी-सुविधांसाठी राखीव ठेवला आहे. हातकणंगले बसस्थानकासमोर १२५० मीटरचा उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे. पूर्ण मार्गावर १५ अंडर पास असतील. ठेकेदाराचे नाव अंतिम झाले असून, तसा अहवाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांकडे वर्ग केला जाईल. ठेकेदाराला काम सुरू करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत दिलेली असते. त्यामुळे मे किंवा जूनपर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

दृष्टिक्षेपात
एकूण ३३ किलोमीटरचा रस्ता
संपूर्ण महामार्गासाठी ११९२.८४ कोटींची तरतूद
केवळ रस्त्यासाठी ७५० कोटींचा निधी
हातकणंगले व कृष्णा नदीवर उड्डाण पूल
महामार्गावर एकूण १५ ठिकाणी अंडर पास

कोट
महामार्गासाठी ठेकेदार निश्‍चित झाला आहे; मात्र अद्याप तसा आदेश आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही; परंतु लवकरच कामाला सुरुवात होईल.
- चंद्रकांत भरडे, अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli Accident: शोकसंतप्त नागरिकांचे महामार्गावर आंदोलन; चौघांचा मृत्यू, दोन गंभीर, भरधाव ट्रकची सहा युवकांना जबर धडक

Kolhapur Health Crisis : रात्री डॉक्टर नव्हते, रुग्णवाहिका वेळेवर मिळाली नाही; बाळ असलेल्या आईच्या पोटात रक्तस्त्राव झाला अन्

Latest Marathi News Updates: शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी शिक्षण विभागाकडून केली जाणार- नागो गाणार

Nanded Farmers: नापिकी, कर्जबाजारीपणा आणि बाजारभावाचा फटका; नांदेडमध्ये सात महिन्यांत ८९ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले

Bank Bharti 2025: युनियन बँकेत मोठी पदभरती; पगार ९० हजार, असा करा अर्ज

SCROLL FOR NEXT