कोल्हापूर

गड- रवळनाथ संस्था

CD

GAD264.JPG 47849
गडहिंग्लज ः रवळनाथ संस्थेला भेटीप्रसंगी डॉ. माधव वेलिंग यांचा सत्कार करताना एम. एल. चौगुले. शेजारी जितेंद्र नाईक, आर. एस. निळपणकर, डी. के. मायदेव, महेश मजती आदी.

‘रवळनाथ’चे लोकहिताला प्राधान्य
डॉ. माधव वेलिंग ः संस्था समूहाला भेट

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २६ ः सहकारात सचोटीने काम करणाऱ्या संस्था दुर्मीळ आहेत. त्यात रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटी एक आहे. विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून रवळनाथने नेहमीच लोकहिताला प्राधान्य दिले आहे, असे गौरवोद्‌गार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या राज्य सुकाणू समितीचे सदस्य प्रा. डॉ. माधव वेलिंग यांनी काढले.
येथील श्री रवळनाथ को-ऑप हौसिंग फायनान्स सोसायटी, झेप ॲकॅडमीला त्यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले अध्यक्षस्थानी होते. गडहिंग्लज अर्बन बॅंकेचे अध्यक्ष जितेंद्र नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. वेलिंग म्हणाले, ‘ग्रामीण विद्यार्थ्यांना झेपच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेसाठी पोषक वातावरण रवळनाथने तयार केले आहे. आवश्यक सुविधा दिल्या आहेत. भावी पिढीसाठी रवळनाथचे कार्य उल्लेखनीय आहे.’
चौगुले म्हणाले, ‘शैक्षणिक क्षेत्रातील अनेक उच्चशिक्षित मान्यवर संस्थेशी जोडले आहेत. त्यामुळे रवळनाथ व शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने भविष्यात काही शैक्षणिक उपक्रम राबविण्याचा मानस आहे.’ रवळनाथचे संचालक महेश मजती यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संचालक डॉ. आर. एस. निळपणकर यांनी प्रास्ताविक केले. सीमा माने यांनी सूत्रसंचालन केले. सीईओ डी. के. मायदेव यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Heatwave: पुणे परिसरात उष्णतेचा तडाखा; लोहगावचा पारा ४२ अंशांवर, तापमान आणखी वाढणार, अंगाची लाहीलाही..

मृण्मयी देशपांडेचं चालतं फिरतं घर पाहिलत का? आता महिनाभर तिथेच राहणार, Viral Video

Kolhapur Gokul Politics : पंधरा दिवसांपूर्वी रुजू झालेले सहायक दुग्ध निबंधक कदम यांची तडकाफडकी बदली, गोकुळचे राजकारण तापलं; मुश्रीफांना अप्रत्यक्ष दणका

Latest Marathi News Live Update: राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

IPL 2026: कोलकता संघाला पहिल्या विजयाची प्रतीक्षा; गुजरातशी आज अहमदाबादमध्ये लढणार, रहाणेच्या नेतृत्वाचा कस, कशी असेल Playing XI

SCROLL FOR NEXT