कोल्हापूर

दौलतची बिले जमा

CD

‘दौलत-अथर्व’चे
४ लाख टन गाळप पूर्ण

मानसिंग खोराटे ; १६ ते ३१ जानेवारीअखेरची बिले जमा

चंदगड, ता. २६ ः हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत- अथर्व कारखान्याने चालू गळीत हंगामात ४ लाख टन गाळप पूर्ण केले आहे. ऊस उत्पादकांची दर पंधरा दिवसांची बिले आदा केली आहेत. अलीकडे १६ ते ३१ जानेवारीअखेर गाळप उसाची बिले संबंधित उत्पादकांच्या बॅंक खात्यावर जमा केली आहेत. ‘अथर्व’चे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी ही माहिती दिली.
१६ ते ३१ जानेवारी या कालावधीत कारखान्याकडे ७३ हजार ३१८ टन ऊस गाळपासाठी आला होता. त्याचे बिल २२ कोटी ७७ लाख ८७ हजार रुपये संबंधित ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केले आहेत. शेती विभागाने तोडणी- ओढणीचे योग्य नियोजन केल्यामुळे या वर्षी चार लाख टनाचा टप्पा पूर्ण करण्यात यश आले आहे. कार्यक्षेत्रातील उसाला प्राधान्य दिले. यंदा कमी उत्पादकतेमुळे उसाची उपलब्धता कमी झाली. त्यामुळे गळीत हंगामाचा कालावधीही कमी झाला. त्याचा फटका कारखान्याला बसला आहे. शेतकरी, तोडणी, ओढणी वाहतूकदार यांनाही आर्थिक झळ बसली. तरीही शेतकरी केंद्रबिंदू ठेवून गाळप हंगामाचे नियोजन राबविल्याचे खोराटे यांनी सांगितले. दर पंधरा दिवसांनी बिले आदा करण्याची परंपरा यावर्षीही कायम करण्यात यश आल्याचे सांगितले. पृथ्वीराज खोराटे, संचालक विजय पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे, एम. आर. पाटील, दत्तकुमार रक्ताडे, दयानंद देवाण, सुनील चव्हाण, सिध्देश्वर शिंदे, सचिन नाईक, सदाशिव गदळे, हणमंत यादव, अश्रू लाड आदी पदाधिकाऱ्यांसह कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात बेसिक पे 69000 रुपये, वार्षिक वाढ 6 टक्के; 51 पानांचं निवेदन

Radhanagari Bee Attack: रक्षाविसर्जनाला कावळ्याची वाट पाहणं पडलं महागात! कावळ्यासोबत मधमाशा आल्या अन्; १०० जखमी तर १२ गंभीर, लोकांना पळता भुई थोडी, व्हिडिओ व्हायरल

Ruturaj Gaikwad: 'काळजी नको, लवकरच मी...', ऋतुराज खराब फॉर्मवर स्पष्ट बोलला; CSK च्या खराब फिल्डिंगबद्दल काय म्हणाला?

Latest Marathi News Live Update: नेस्को सेंटर मध्ये ड्रग्स पार्टी प्रकरणात लायझनिंग करणारा इंद्रजीत सिंग याला तात्काळ अटक करा; मनसेची मागणी

चौधरी बिहारचे नवे 'सम्राट', मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ; दोन उपमुख्यमंत्र्यांचाही शपथविधी, नितीशकुमार उपस्थित

SCROLL FOR NEXT