फोटो 54002
कोल्हापूर ः हजरत पीर बाबूजमाल कलंदर यांच्या उरूसानिमित्त गुरूवारी रात्री गलेफ मिरवणूक काढण्यात आली
पारंपरिक वाद्यांच्या गजरात
बाबूजमाल कलंदर गलेफ मिरवणूक
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७ हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक हजरत पीर बाबूजमाल कलंदर यांच्या उरूसानिमित्त गुरूवारी रात्री गलेफ मिरवणूक काढण्यात आली. बाबूजमाल उरुसानिमित्त मंगळवारपासून विविध धार्मिक विधी झाले. आज पारंपारिक वाद्यांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीमध्ये भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रात्री दहाच्या सुमारास बाबूजमाल दर्गाह येथे फतिहा पठण झाले. पी-ढबाक, हलगी घुमक्याच्या गजरात, उंट, सजवलेल्या घोड्यांच्या लवाजम्यासह आतषबाजीने मिरवणुकीला सुरुवात झाली. गावकामगार पाटील यांच्या घराला भेट देऊन गुजरी, जुना राजवाडा येथील राजर्षी शाहू महाराजांच्या गादीच्या ठिकाणी फतिहा पठण झाले. छत्रपती शिवाजी चौकातील घुडणपीर दर्गापासून पापाची तिकटीमार्गे बाबूजमाल दर्गाह येथे रात्री उशिरा आली. यानंतर गलेफ चढविण्यात आला. यावेळी दर्ग्यांचे मुख्य खादिम लियाकत मुजावर, एैनुद्दीन मुल्ला, अल्ताफ मुतवल्ली, शकील मुतवल्ली, इम्तियाज मुतवल्ली, दिलावर मुजावर, शाहरूख गडवाले, अमित चव्हाण, ओंकार शिंदे, राजेश महात, सुशांत निकम, विवेक पंडत यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.