साखर पोते फोटो
-
साखर आयातीतून
महसुलाची गोडी
६० टक्क्यांपर्यंत कर ः दोन वर्षांपासून बंदी, आयात कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून निर्यात
..............
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ ः दोन वर्षांपासून साखरेच्या आयातीवर निर्बंध असले तरी तत्पूर्वी साखर आयातीतून केंद्र सरकारला कोट्यवधींचा महसूल मिळाला आहे. सर्वाधिक साखर उत्पादन करणाऱ्या ब्राझीलपासून ते अन्य देशांपर्यंत काही वर्षात लाखो टन साखरेची आयात केली. बहुंताशी आयात साखर ही कच्च्या स्वरूपात आली, त्यावर प्रक्रिया करून ती पुन्हा संबंधित देशांना पाठवली. आयात साखरेवर ६० टक्क्यांपर्यंत कर लावता येतो, ज्या त्या वर्षी हा कर वेगळा होता, त्यातून कोट्यवधींचा महसूल केंद्र सरकाला मिळाला आहे.
बाजारातील मागणी, पुरवठ्याचा विचार करून काही वर्षांपासून केंद्र सरकारने साखर निर्यातीचे धोरण स्वीकारले आहे. देशांतर्गत साखरेचा दर स्थिर राहावा, हा त्यामागचा उद्देश आहे. दर वर्षासाठी ठराविक टन साखर निर्यातीला परवानगी दिली जाते. कारखान्यांना त्यांच्या उत्पादनाच्या प्रमाणात कोटा दिला जातो. साखरेचा ठरवून दिलेला कोटा निर्यात करणे बंधनकारक आहे. आता निर्यातीचे धोरण बंधनकारक असले तरी पूर्वी साखरेची आयातही देशात झाली आहे.
विशेषतः ब्राझील, थायलंड या भारताला जवळ असलेल्या देशातून कच्ची साखर आयात केली जाते, त्यावर प्रक्रिया करून तेवढीच साखर पुन्हा निर्यात केली जाते. फक्त उसापासूनच नव्हे तर बीट व अन्य पदार्थापासून तयार होणाऱ्या साखरेचाही यात समावेश होता. या साखरेवर प्रक्रिया करणारे उद्योग हे खासगी आहेत आणि त्यांचे कार्य हे समुद्र किनाऱ्यावर असलेल्या फोर्टवर चालते. वाहतूक खर्च कमी व्हावा, हा त्यामागचा उद्देश आहे.
२००४-२००५ मध्ये महाराष्ट्रासह ऊस उत्पादन करणाऱ्या काही राज्यात उसावर लोकरी माव्याचे संकट होते. त्यामुळे महाराष्ट्रात आणि देशातही साखरेचे उत्पादन घटले. त्यावेळी आयात साखरेवर प्रक्रिया करून ती देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी परवानगी दिली होती. पुढील हंगामात जेवढी आयात साखर देशांतर्गत बाजारात विकली तेवढीच साखर निर्यातीला परवानगी दिली होती.
...............
या देशातून झाली साखर आयात
गेल्या २० वर्षांत ब्राझीलमधून सर्वाधिक साखर आयात झाली. याशिवाय अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, थायलंड, फ्रान्स, न्युझीलंड, इटली, नेदरलँडस, जपान, स्वित्झर्लंड या देशातून कमी अधिक प्रमाणात साखरेची आयात झाली आहे.
..............
दृष्टिक्षेपात साखर आयात
-हंगामाचे वर्ष*आयात साखर (मे. टनमध्ये)*आयात साखरेची किंमत (आकडे कोटीत)
*२०१५-१६ *१६,०००२७ *४०११.०३
*२०१६-१७ *२१,४४,४२९ *६८४९.६३
*२०१७-१८ *२४,०१,४८४ *६०१७.२२
*२०१८-१९ *१४,८७,६७७ *३१४७.५०
*२०१९-२० *११,१४,८२८ *२४४१.९५
*२०२०-२१ *१९,६३,२३३ *४६९८.६४
*२०२१-२२ *३,५८,४३१ *१२२७.४०
*२०२२-२३ (एप्रिल ते जून) *१२३५ *१६.२६
.................................................
(स्त्रोत-केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय)
.....................
गेल्या २० वर्षांत ब्राझिलसह काही देशांतून साखर आयात केली. पण देशांतर्गत बाजारात या साखर विक्रीला परवानगी नव्हती. देशांतर्गत उत्पादन, जागतिक बाजारपेठेतील गतिशिलता आणि व्यापार धोरणांचा साखर आयातीवर प्रभाव आहे. दोन वर्षांपासून साखर आयातीचे प्रमाण घटले आहे.
-पी. जी. मेढे., साखर उद्योगाचे अभ्यासक
.............
२००४-५ मध्ये महाराष्ट्रात लोकरी माव्यामुळे साखर उत्पादन घटले. त्यावेळी आयात साखरेवर प्रक्रिया करून ती देशात विकण्यास परवानगी दिली होती. पण त्याच्या पुढच्या हंगामात तेवढीच साखर निर्यात करणे कारखान्यांना बंधनकारक होते. आयात साखरेवर लावलेला करामुळे केंद्राच्या महसुलात भर पडली.
-विजय औताडे, साखर उद्योगाचे अभ्यासक
...............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.