कोल्हापूर

टुडे १०२

CD

66021

अवसायन कालावधीला वर्षाची मुदतवाढ
गडहिंग्लजची शिवाजी बँक : विलीनीकरण, स्वबळासाठी निर्माण झालीय संधी
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २४ : आर्थिक अरिष्टात सापडलेल्या येथील श्री शिवाजी सहकारी बँकेवर १० वर्षांपासून अवसायक आहेत. अवसायन कालावधीला पुन्हा एक वर्षाची मुदतवाढ मिळाली आहे. एका दृष्टीने हा शिवाजी बँकेचे विलीनीकरण किंवा स्वबळावर चालविण्याच्या प्रयत्नांसाठी मिळालेला अधिकचा कालावधीच म्हणावा लागेल. त्यामुळे अवसायकांना मिळालेल्या मुदतवाढीकडे त्यादृष्टीने संधी म्हणून पाहणे आवश्यक आहे.
शिवाजी बँकेच्या गडहिंग्लज, हरळी, नेसरी, कोल्हापूर या चार शाखांसह एक विस्तार कक्ष आहे. मुख्य शाखेसह हरळी व कोल्हापूर येथे स्वमालकीच्या इमारती आहेत. सुमारे १३ हजारांहून अधिक सभासद आहेत. चार दशके सुरळीत चाललेल्या बँकेत आर्थिक अनियमितता निर्माण झाली. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने संचालक मंडळ बरखास्त करून वर्ष २०१० मध्ये प्रशासकांची नियुक्ती केली. चार वर्षांनंतर बँक अवसायनात काढली. तेव्हापासून अवसायकांमार्फत बँकेचा कारभार सुरू आहे. या काळात सुमारे साडेआठ कोटींच्या ठेवी दिल्या आहेत. तर सुमारे १२ कोटींच्या कर्जाची वसुली झाली आहे.
दरम्यान, अवसायनाचा कालावधी पहिल्या टप्प्यात दहा वर्षांचा होता. आता त्यात पुन्हा एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. ३१ मार्च २०२६ पर्यंत ही मुदत वाढली आहे. या कालावधीत सध्याच्या कर्जाच्या किमान ५० टक्के वसुलीची अट घातली आहे. सध्या कर्जदारांकडे साडेचार कोटींपर्यंतची रक्कम थकीत आहे. शिवाजी बँकेचे अन्य बँकेत विलिकरण करण्यासाठी किंवा स्वबळावर चालविण्यासाठी प्रयत्न मधल्या काळात झाले होते. त्यादृष्टीने पुन्हा प्रयत्नासाठी हा एक वर्षाचा अधिकचा कालावधीच मिळाला आहे. पण, बँकेचा रद्द झालेला परवाना मिळणे महत्त्‍वाचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra 12th Result 2026 : बारावीचा निकाल जाहीर! कोकण अव्वल, लातूर पिछाडीवर, मुलींचा यशाचा टक्का मुलांपेक्षा ६.३५ ने अधिक

Pune Bhor Child CCTV Video : पुण्यातील अत्याचार करून हत्या केलेल्या ४ वर्षीय चिमुकलीला नेताना सीसीटीव्ही व्हिडिओ समोर

Mumbai Family Death Mystery : कलिंगडात विष नव्हतं, मग मृत्यू कसा झाला? मुंबईतील डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूचं गूढ वाढलं, FDA चा धक्कादायक अहवाल समोर

HSC Result: बारावीनंतर नोकरी करायची आहे ? रेल्वेमध्ये करा उत्तम करिअर, टीटीई होण्यासाठी अशी करा तयारी

Mumbai Crime: १,७४५ कोटी रुपयांचे कोकेन महामुंबईत जप्त, एनसीबीची सर्वात मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT