कोल्हापूर

रिपब्लिकन पार्टीतर्फे रॅली

CD

66050
कोल्हापूर : ‘रिपाइं’तर्फे (आठवले गट) भारत जिंदाबाद महारॅलीत सहभागी कार्यकर्ते.

‘रिपाइं’आठवले गटातर्फे
भारत जिंदाबाद महारॅली
कोल्हापूर, ता. २४ : पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारतावर केलेल्या हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले. त्यांच्या या शौर्याचे कौतुक करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे (आठवले गट) केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशाने आणि जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या नेतृत्वात ‘भारत जिंदाबाद महारॅली’चे आयोजन केले.
ही रॅली बिंदू चौकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सुरू झाली. रॅलीत ‘भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबाद’, वीर जवान तुझे सलाम’, ‘वीर जवान अमर रहे’ अशा घोषणा दिल्या. ‘ऑपरेशन सिंदूर’मधील क्षण, डॉ. आंबेडकरांची प्रतिमा असलेल्या भारतीय नकाशा चित्रारथासह शिवाजी चौक- महापालिका- सीपीआर चौक मार्गे- दसरा चौकात रॅलीची सांगता झाली.
जिल्हाध्यक्ष श्री. कांबळे म्हणाले, ‘‘भारतीय वीर जवानांनी केलेल्या कार्याचे कौतुक रिपब्लिकन पक्षातर्फे करत आहोत. बाबासाहेबांच्या स्वप्नातला एकतेचा हा भारत आहे. आमच्यावर कोण आक्रमण करत असेल तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहोत.’’
राज्य सचिव मंगलराव माळगे, राजेंद्र ठिकपुर्लीकर, दत्ता मिसाळ, गुणवंत नागटिळे, बी. आर. कांबळे, अविनाश शिंदे, सुखदेव बुद्धाळकर, राहुल कांबळे, नंदाताई भास्कर, संजय लोखंडे, प्रदीप मस्के, विकी कांबळे, कृष्णात कांबळे, अविनाश अंबपकर, तानाजी कांबळे, संजय शिंदे, सचिन मोहिते, अतुल सडोलीकर, सरपंच प्रकाश कांबळे, प्रज्योत सूर्यवंशी, सरपंच संदीप कांबळे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Crime News: चिमुकलीवर लैंगिक अत्याचार व खून प्रकरणी ६५ वर्षीय आरोपीला ७ मे पर्यंत पोलिस कोठडी

CSK vs MI Live: मुंबई इंडियन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड! चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध ढेपाळले, पण जगात चमकले; भारतीय संघालाही हे नाही जमले...

Success Story : जिद्दीला सलाम! दोन मुलांचा सांभाळ अन् मोलमजुरी करत निशाने केली 12वी उत्तीर्ण; मिळवले ६८.३३% गुण

Judge Suicide: धक्कादायक! न्यायाधीशांनी जीवन संपवलं; मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला, घटनेनं खळबळ

Yerla River Incident : लग्नासाठी आली अन् काळानं घाला घातला! येरळा नदीत पोहण्यास गेलेल्या 20 वर्षीय तरुणीचा बुडून मृत्यू; सात मुलांना पाण्याबाहेर काढण्यात यश

SCROLL FOR NEXT