67350
पेरणोली (ता.आजरा ) ः येथे पॉवर ट्रिलरने जमिन तयार करताना शेतकरी (छायाचित्र ः श्रीकांत देसाई, आजरा)
पावसाची उघडिपीने मशागतींना वेग
आजरा परिसरात दिलासा; आठवड्याभरात पेरण्या होणार
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ३१ ः आजरा तालुक्यात मॉन्सूनपूर्व पावसाने चांगलाच कहर केला होता. पावसामुळे खरीप पूर्व हंगामी मशागतीची कामे ठप्प झाली होती. तालुक्यात पावसाने उघडीप दिल्यावर शेती मशागतीच्या कामांना वेग आला आहे. सतत पाऊस कोसळत असल्याने मशागतीची कामे ठप्प झाली होती. पण, दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने पुन्हा मशागतीची कामे सुरू झाली आहेत. जमीन नांगरणी, सड वेचणे, बांधबंदिस्तीसह जमीन तयार कऱण्याच्या कामांना वेग आला आहे. शेतकरी कुटुंबांनी शेताकडे वाट धरली आहे. तालुक्याच्या पूर्व भागासह पश्चिम भागात शेतकरी कामात व्यस्त असल्याचे दिसत आहे. ट्रॅक्टर, पॉवर ट्रिलर, बैलजोडीचा वापर करून शेती मशागतीची कामे सुरू झाली आहेत. पावसाची उघडीप अशीच राहिल्यास या दहा बारा दिवस भात पेरणीलाही वेग येणार आहे.
गवत भरणी वेगावणार
मे महिन्याच्या अखेरीपर्यंत पावसाळ्यापूर्वीची कामे केली जातात. यामध्ये पावसाळ्यात जनावरांसाठी गवत भरणीचे काम केले जाते. लाकडे (सरपण), खत भरणी केली जाते. यंदा पावसाने ही कामे ठप्प झाली होती. पावसाच्या उघडिपीमुळे पुन्हा कामे सुरू झाली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.